हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

अल्पवयीन मुलाच्या हातात ट्रॅक्टर; अपघातात मृत्यू — डोणगावमध्ये अवैध गौण खनिज वाहतुकीचा धक्कादायक पर्दाफाश

On: January 4, 2026 8:18 AM
Follow Us:
डोणगावमध्ये अल्पवयीन मुलाच्या हातात ट्रॅक्टर अपघात

डोणगाव/कट्टा न्यूज नेटवर्क 

डोणगाव : अल्पवयीन मुलाच्या हातात ट्रॅक्टर दिल्यामुळे घडला अपघात  ही घटना डोणगाव परिसरात घडून आली असून, या भीषण अपघातात एका अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही ट्रॅक्टर दिल्याने अल्पवयीन मुलाच्या हातात ट्रॅक्टर दिल्याने अपघात घडल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

ही घटना डोणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आरेगाव माळ परिसरात २ जानेवारी रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजताच्या सुमारास घडली. अल्पवयीन ऋषिकेश किरण भुतेकर हा (MH 28 T 8709) क्रमांकाचा ट्रॅक्टर चालवत असताना रस्त्यालगतच्या नालीत घसरून ट्रॅक्टर उलटला.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या अपघातात ऋषिकेश ट्रॅक्टरखाली दबला गेला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. अल्पवयीन मुलाच्या हातात ट्रॅक्टर अपघात प्रकरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

मृतकाचे वडील दत्ता पुंजाजी भुतेकर यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर मालक पवन अरुण काळे (रा. डोणगाव) याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलाला वाहन चालविण्यास दिल्याप्रकरणी आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याबाबत डोणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, डोणगाव परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याची चर्चा आहे. या बेकायदेशीर कामासाठी अल्पवयीन मुलांचा चालक म्हणून वापर केला जात असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. आरेगाव रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत ट्रॅक्टरची वर्दळ असते, तर काही ठिकाणी वेगाने पोहोचण्यासाठी शर्यतीही लावल्या जात असल्याची माहिती पुढे आली आहे.

रात्रीच्या वेळी पोलिस गस्त सुरू असतानाही ही वाहतूक कशी सुरू राहते, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये रात्री-बेरात्री ट्रॅक्टर वाहतूक तसेच लोकेशन देणारे युवक दुचाकीवर फिरताना दिसत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

हे पण वाचा..

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना फसली? दोन वर्षांपासून शेतकरी लाभापासून वंचित — महावितरणवर गंभीर आरोप.

या गंभीर घटनेनंतर महसूल आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करून अवैध गौण खनिज उत्खननावर कठोर पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी डोणगावसह परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

हे पण वाचा..

अखेर कारवाई! शिंदी येथील तत्कालीन ग्रामसेवक दिनकर काळे निलंबित — महिलांशी गैरवर्तन व धमकी प्रकरण.


हे आवश्यक करा.
तुमच्या परिसरातील अवैध उत्खनन, बेकायदेशीर वाहतूक किंवा गंभीर सामाजिक प्रश्नांची माहिती आम्हाला द्या.
Kattanews.in — ग्रामीण महाराष्ट्राचा विश्वासार्ह आणि निर्भीड आवाज.


हे पण वाचा ..

“बाई मेली तरी मला फरक पडत नाही!” — सिंदखेडराजा तालुक्यातील वडाळी ग्रामपंचायत भ्रष्टाचारावर महिलाचे आमरण उपोषण; झेडपी CEO चा कथित संतापजनक उद्गार.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

साखरखेर्डा येथे सुसज्ज बसस्थानक उभारण्याची मागणी

७५ गावांच्या प्रवाशांचा प्रश्न कधी सुटणार? साखरखेर्ड्यात सुसज्ज बसस्थानकासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे साकडे

ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते अभिनेत्री व पत्रकार किरण वाघ यांना साई प्रेरणा गौरव पुरस्कार प्रदान करताना

शिर्डीत किरण वाघ यांचा दुहेरी गौरव! ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते ‘साई प्रेरणा गौरव पुरस्कार’

लोणार नगरपरिषदेत घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात निवेदन देताना डॉ. गोपालसिंह बछिरे व शिवसेना उ.बा.ठा. पदाधिकारी

घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात शिवसेना उ.बा.ठा. आक्रमक; 15 दिवसांत माहिती न दिल्यास लोणार नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा

मेहकरमध्ये एका रात्रीत ज्वेलर्स आणि मेडिकल स्टोअरमध्ये धाडसी चोरी

मेहकर हादरले! ‘आज माझे दुकान… उद्या कोणाचे?’ एका रात्रीत ज्वेलर्ससह मेडिकल स्टोअर फोडले; व्यापाऱ्यांची उडाली झोप

मेहकर न्यायालयातील बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

न्याय देणाऱ्यांच्या दारातच भ्रष्टाचार! मेहकर न्यायालयात खळबळ; वॉरंट थांबवण्यासाठी बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

पाडळी शिंदे येथे करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणानंतर घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ

करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना केली अटक

Leave a Comment