हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

जबरी चोरी प्रकरणात रिसोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवघ्या १२ तासांत आरोपी अटकेत

On: December 29, 2025 8:04 AM
Follow Us:
रिसोड पोलिसांची जबरी चोरी प्रकरणात आरोपी अटक कारवाई

वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरु पाटील 

रिसोड जबरी चोरी प्रकरणात रिसोड पोलिसांनी अतिशय जलद तपास करत मोठी कामगिरी बजावली आहे. रिसोड जबरी चोरी घटनेनंतर अवघ्या १२ तासांत गुन्ह्यातील आरोपी अटक करण्यात आले असून ही कारवाई पोलिसांच्या कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण ठरत आहे.

२३ डिसेंबर रोजी रात्री सेनगाव रोडवरील घोन्सर फाट्याजवळ दोन अनोळखी इसमांनी एका युवकाला मारहाण करून जबरी चोरी केल्याची घटना घडली. या घटनेत ९७ हजार रुपये किमतीची दुचाकी, ७ हजार रुपये रोख व १० हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

अमोल प्रकाश खिल्लारे (वय २८, रा. पुसेगाव, ता. सेनगाव, जि. हिंगोली) यांनी २४ डिसेंबर रोजी रिसोड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी डी.बी. पथकाला तपासाच्या सूचना दिल्या.

सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सेनगाव रोडवरील फुटाणा फॅक्टरी परिसरातून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीस गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, सहायक पोलीस अधीक्षक नवदिप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, श्रीकिसन नागरे, मनोहर वानखेडे, रवी अढागळे, विनोद घनवट, परमेश्वर भोणे यांनी पार पाडली.


👉 KattaNews.in Follow करा

महाराष्ट्रातील ताज्या क्राईम, राजकारण आणि ब्रेकिंग बातम्यांसाठी KattaNews.in ला फॉलो करा व ही बातमी शेअर करा.


🔗 हे पण वाचा…

रिसोड पोलिसांची जबरी चोरी प्रकरणात आरोपी अटक कारवाई

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

साखरखेर्डा येथे सुसज्ज बसस्थानक उभारण्याची मागणी

७५ गावांच्या प्रवाशांचा प्रश्न कधी सुटणार? साखरखेर्ड्यात सुसज्ज बसस्थानकासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे साकडे

ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते अभिनेत्री व पत्रकार किरण वाघ यांना साई प्रेरणा गौरव पुरस्कार प्रदान करताना

शिर्डीत किरण वाघ यांचा दुहेरी गौरव! ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते ‘साई प्रेरणा गौरव पुरस्कार’

लोणार नगरपरिषदेत घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात निवेदन देताना डॉ. गोपालसिंह बछिरे व शिवसेना उ.बा.ठा. पदाधिकारी

घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात शिवसेना उ.बा.ठा. आक्रमक; 15 दिवसांत माहिती न दिल्यास लोणार नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा

मेहकरमध्ये एका रात्रीत ज्वेलर्स आणि मेडिकल स्टोअरमध्ये धाडसी चोरी

मेहकर हादरले! ‘आज माझे दुकान… उद्या कोणाचे?’ एका रात्रीत ज्वेलर्ससह मेडिकल स्टोअर फोडले; व्यापाऱ्यांची उडाली झोप

मेहकर न्यायालयातील बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

न्याय देणाऱ्यांच्या दारातच भ्रष्टाचार! मेहकर न्यायालयात खळबळ; वॉरंट थांबवण्यासाठी बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

पाडळी शिंदे येथे करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणानंतर घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ

करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना केली अटक

Leave a Comment