हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

लोककवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन : कवी संमेलनाध्यक्षपदी अजीम नवाज राही

On: December 22, 2025 5:49 PM
Follow Us:
लोककवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनाध्यक्षपदी अजीम नवाज राही

विशाल गवई/प्रतिनिधी

बुलढाणा : लोककवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन 2025 हे बुलढाणा जिल्ह्यासाठी साहित्यिक दृष्टीने ऐतिहासिक ठरणार असून या लोककवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलनाच्या निमंत्रित कवी संमेलनाध्यक्षपदी प्रख्यात मराठी कवी व नामवंत निवेदक अजीम नवाज राही यांची निवड करण्यात आली आहे. लोककवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन हे महाराष्ट्रातील साहित्यिक चळवळीतील महत्त्वाचे व्यासपीठ मानले जाते. अजीम नवाज राही यांची निवड झाल्याने लोककवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलनाची उंची अधिक वाढली आहे.महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ व मराठी भाषा विभाग यांच्या सहकार्याने, लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान बुलढाणा यांच्या विद्यमाने २७ व २८ डिसेंबर २०२५ रोजी हे दोन दिवसीय साहित्य संमेलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यनगरी, गर्दै वाचनालयाच्या ऐतिहासिक सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध कथाकार विलास सिंदीकर भूषविणार असून उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते होणार आहे.

निमंत्रितांच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष अजीम नवाज राही हे महाराष्ट्रातील लेखणी आणि वाणी या दोन्ही क्षेत्रातील प्रभावी आणि वलयांकित नाव आहे. व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळातला एकांत, वर्तमानाचा वतनदार, तळमळीचा तळ आणि वळीवाच्या वेळा हे त्यांचे गाजलेले व दर्जेदार कवितासंग्रह मराठी साहित्यविश्वात विशेष मानाचे मानले जातात.

निवेदक व वक्ता म्हणून त्यांच्या प्रभावी, रसाळ आणि ओघवत्या वाणीने त्यांनी राज्यभरातील साहित्यरसिकांवर अधिराज्य गाजवले आहे. त्यांच्या साहित्यकृतींना आजवर महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य पुरस्कार, केशवसुत पुरस्कार, शरदचंद्र मुक्तीबोध पुरस्कार, नारायण सुर्वे पुरस्कार, इंदिरा संत पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, लोकमत साहित्य पुरस्कार यांसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

शैक्षणिक अभ्यासक्रमात कवितांचा समावेश

अजीम नवाज राही यांच्या व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळातला एकांत, वर्तमानाचा वतनदार, तळमळीचा तळ या कवितासंग्रहांचा इयत्ता १० वी, ११ वी तसेच महाराष्ट्रातील ११ विद्यापीठांमध्ये BA, MA, BCom, BSc अभ्यासक्रमात समावेश आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यासाठी ही बाब नक्कीच अभिमानास्पद आहे.

लोककवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने बुलढाणा शहर साहित्यिक, कवी, अभ्यासक आणि रसिकांसाठी विचारमंथनाचे केंद्र ठरणार आहे.


📌 हे पण वाचा..


👉 वाचत राहा : KattaNews.in | बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

Leave a Comment