हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

रिसोड महावितरण कार्यालयासमोर अतिक्रमण – वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

On: December 11, 2025 3:02 PM
Follow Us:
रिसोड महावितरण कार्यालयासमोर अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

रिसोड महावितरण कार्यालयासमोर अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी

रिसोड शहरातील महावितरण कार्यालयासमोर अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे वाहतूक कोंडी, अपघातांची मालिका आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत आहे. नगर पालिका रिसोड आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांना अनेकवेळा तक्रारी देण्यात आल्या असल्या तरी, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

अतिक्रमणामुळे वाहनचालकांना रस्ता स्पष्ट दिसत नाही. दुचाकी, चारचाकी आणि पादचारी यांच्यात धडक होण्याच्या घटना सतत वाढत आहेत. स्थानिक नागरिक म्हणतात, “वाशिम रोडवरील या ठिकाणी कोणत्याही क्षणी जीवितहानी होऊ शकते.”

याच मार्गावर महाविद्यालय असल्यामुळे दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी, विशेषतः मुली, या रस्त्याने ये-जा करतात. अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला असून, वाढलेली वाहतूक त्यांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोक्याचे कारण ठरत आहे.

हे पण वाचा..

वाशीम: Strong Room EVM सुरक्षा व मतमोजणी प्रक्रिया सुरक्षित करण्यासाठी निवेदन.

महावितरण कार्यालयात दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक वीजबिल भरण्यासाठी येतात. वाढती गर्दी आणि अराजकतेमुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. नागरिक, व्यापारी आणि विद्यार्थी संघटनांकडून अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावी, अशी मागणी केली जात आहे.

संपूर्ण बातमी वाचा

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Maharashtra government decision to sell kerosene at petrol pumps due to LPG gas shortage

गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा

Leave a Comment