हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
Ladki Bahin Yojana : उद्यापासून खात्यात 1500 रुपये… पण एक अट रिसोड नगर परिषद निवडणूक: भाजप-शिवसेना शिंदे गLadki Bahin Yojana eKYC Deadline: मुदतवाढ होणार का? आदिती तटकरेंची२४ वर्षीय शेतकरीपुत्राची विष प्राशन करून आत्Buldhana : 5 एकरात उभा राहणार बुद्ध विहार धम्मपीठ – आदेऊळगाव राजात तलवारीने केक कापून वाढदिवस साज

नगरपंचायत निवडणूक 2025 : नामनिर्देशनपत्रासाठी कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही – राज्य निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे स्पष्टीकरण!

On: November 14, 2025 7:22 PM
Follow Us:

वाशिम| जिल्हा प्रतिनिधी: नारायणराव आरू पाटील

राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी संकेतस्थळावर फक्त नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातील माहिती भरणे आवश्यक आहे; त्यासोबत कोणतेही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
नोंदणी करण्यासाठी विकसित केलेल्या mahasecelec.in संकेतस्थळावर उमेदवारांनी संपूर्ण माहिती भरल्यानंतर ती मुद्रित करुन स्वतः व सूचकांची स्वाक्षरी करणे गरजेचे आहे. त्यानंतर मुद्रित प्रत व इतर आवश्यक कागदपत्रे (जसे की नादेय प्रमाणपत्र, शौचालय वापर प्रमाणपत्र, बँक तपशील, जातप्रमाणपत्र, पक्षाचा जोडपत्र इ.) संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे विहित मुदतीत सादर करावी लागतील.

उद्योजित मुदतीबद्दल महत्त्वाचे ठराव:

  • नोंदणी संकेतस्थळ 17 नोव्हेंबर 2025 दुपारी 2 वाजेपर्यंत 24 तास उघडे राहणार आहे.
  • सही केलेली मुद्रित प्रत व कागदपत्रांचा संपूर्ण संच 17 नोव्हेंबर 2025 दुपारी 3 वाजेपर्यंत संबंधित अधिकारींकडे सादर करणे बंधनकारक आहे.
  • नामनिर्देशनपत्र शनिवारी, 15 नोव्हेंबर 2025 (सुटीचा दिवस)देखील स्वीकारण्यात येईल; परंतु रविवारी, 16 नोव्हेंबर 2025 ला स्वीकारले जाणार नाही.

राज्यभरातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपद तसेच अध्यक्षपदांसाठी नामनिर्देश सुरू आहेत. इच्छुक उमेदवारांनी लॉगिन आयडी व पासवर्ड सुरक्षित ठेवावेत कारण ते नामनिर्देशन व शपथपत्रातील माहिती भरण्यास आवश्यक आहे.

सूचना: सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.

आता नोंदणी करा — mahasecelec.in

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!