हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

भोकरदन नगरपरिषदेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा विजय; उपाध्यक्षपदी सौ. सुरेखाताई जाधव देशमुख

On: January 14, 2026 6:39 PM
Follow Us:
भोकरदन नगरपरिषद उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सौ. सुरेखाताई जाधव देशमुख विजयी

भोकरदन | १४ जानेवारी २०२६

भोकरदन नगरपरिषद उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
भोकरदन नगरपरिषद उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत सौ. सुरेखाताई बाळासाहेब जाधव देशमुख यांची निवड करण्यात आली.
भोकरदन नगरपरिषद उपाध्यक्ष निवडणुकीचा निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.या निवडणुकीत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश चिने यांची स्वीकृत सदस्य पदी निवड करण्यात आली असून
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून नईम काद्री यांचीही स्वीकृत सदस्य पदी निवड झाली आहे.
निवडीनंतर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून दोन्ही नेत्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.या प्रसंगी माजी आमदार चंद्रकांत दानवे, नगराध्यक्ष समरीन मिर्झा बेग,
सुधाकर दानवे, अंकुश जाधव, शफिक पठाण, चंद्रकांत पठारे,
गंगाधर कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
भोकरदन नगरपरिषदेत नगराध्यक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे एकूण नऊ नगरसेवक निवडून आले आहेत.
उपाध्यक्ष निवडणुकीत नगराध्यक्षांचा निर्णायक मताचा अधिकार असल्याने
बहुमताच्या जोरावर सौ. सुरेखाताई जाधव देशमुख यांचा विजय निश्चित झाला.नगरपरिषदेत भाजपाचे आठ तर शिंदे शिवसेनेचा एक नगरसेवक निवडून आला असून
काँग्रेसचे दोन नगरसेवक विजयी झाले आहेत.
स्वीकृत सदस्यांसह एकूण नगरपरिषद सदस्यसंख्या २२ इतकी आहे.


👉 वाचकांसाठी महत्त्वाचे

  • स्थानिक राजकारणातील ताज्या घडामोडी सर्वप्रथम वाचा
  • नगरपरिषद व पंचायत निवडणुकांचे अचूक अपडेट्स
  • राज्य व जिल्हास्तरीय राजकीय बातम्या

👉 अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

Related News

 

संजीव पाटील

संजीव पाटील हे २० वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असलेले पत्रकार असून महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, प्रशासकीय व सार्वजनिक घडामोडींचे राज्यभरातून वार्तांकन करतात. नागरिकांचे प्रश्न आणि प्रशासनाशी संबंधित घडामोडी तथ्याधारित व विश्वासार्ह पद्धतीने मांडणे ही त्यांची ओळख आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment