हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

रिसोड नगरपरिषदेत सत्ता स्पष्ट! उपाध्यक्षपदी शिंदे सेनेचे विष्णू कदम; भाजप-ठाकरे सेनेला स्वीकृत नगरसेवक पद

Follow Us:
रिसोड नगरपरिषदेत उपाध्यक्षपदी निवड झालेले शिंदे सेनेचे नगरसेवक विष्णू कदम

रिसोड (वाशिम) १४ जानेवारी २०२६

रिसोड नगरपरिषदेत सत्ता स्पष्ट होताच शहराच्या राजकारणात नवे सत्तासमीकरण समोर आले आहे. रिसोड नगरपरिषद निवड प्रक्रियेत शिंदे सेनेचे विष्णू कदम यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
त्याचबरोबर भाजपकडून अक्षय (भैय्या) देशमुख व ठाकरे सेनेकडून सुधाकर देशमुख यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याने रिसोड नगरपरिषदेत सत्ता स्पष्ट झाल्याचे चित्र दिसत आहे.
या निवडीनंतर रिसोड शहरात विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
उपाध्यक्षपदी विष्णू कदम यांची निवड झाल्यानंतर शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.भाजपचे स्वीकृत नगरसेवक अक्षय उर्फ भैय्या देशमुख यांच्या निवडीचा आनंद
माजी खासदार व माजी मंत्री अनंतराव देशमुख यांच्या निवासस्थानी
फटाक्यांची आतषबाजी करत आणि गुलाल उधळून साजरा करण्यात आला.
कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत विजयाचा आनंद व्यक्त केला.त्याचप्रमाणे, माजी खासदार भावनाताई गवळी यांच्या निवासस्थानीही समर्थकांनी फटाके फोडून आणि जोरदार घोषणा देत आनंद साजरा केला.

दुसरीकडे, महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पक्षाचे स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब उर्फ सुधाकर देशमुख
यांच्या निवडीचा आनंद कार्यकर्त्यांनी आमदार अमित झनक
यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर फटाके फोडून साजरा केला.

नगरपरिषदेत तिन्ही प्रमुख पक्षांना जबाबदाऱ्या मिळाल्याने
आगामी काळात रिसोड शहराच्या विकासासाठी सकारात्मक निर्णय होतील,
अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

नवीन निवड झालेले पदाधिकारी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी
कटिबद्ध राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करीत आहेत.


👉 वाचकांसाठी आवाहन

रिसोड व वाशीम जिल्ह्यातील ताज्या राजकीय, सामाजिक व ग्रामीण बातम्यांसाठी
Kattanews.in ला नियमित भेट द्या.
आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.


🔗 Related News

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

साखरखेर्डा येथे अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान करताना भाजपचे मान्यवर

साखरखेर्ड्यात अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा सन्मान; पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा उपक्रम

श्वेता महाले संजय गायकवाड वाद बुलढाणा राजकारण

श्वेता महाले-संजय गायकवाड वाद पुन्हा पेटला, इंस्टाग्राम व्हिडिओतून थेट चिमटा ‘रावण बनकर आओगे तो…’

शिवदास रिंढे बुलढाणा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस फेरनिवड

शिवदास रिंढे यांची बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी फेरनिवड

श्वेता महाले संजय गायकवाड वाद बुलढाणा भाजप शिवसेना

‘लहान मुलगा इकडे, बायको तिकडे, मोठा मुलगा तिकडे…’ ‘तुम्ही शिवसेना वाढवताय की स्वतःचा परिवार?’ श्वेता महालेंचा संजय गायकवाडांवर थेट निशाणा

संजय गायकवाड विनयभंग गुन्हा बुलढाणा

संजय गायकवाड विनयभंग गुन्हा: बुलढाण्यात शिवसेना आमदारावर FIR दाखल, नवा वाद चिघळला

Leave a Comment