हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
‘आमने–सामने’ लढणारे 2 नेते एकत्र: डॉ. शिंगणे–डगेट-टुगेदरचा धक्कादायक परिणाम: चॅटिंग व्हायरशेतीच्या वादातून रक्तरंजित हल्ला! नागापूर-डोमहावितरण भरतीत 1120 पदे रिक्त; तिसरी निवड यादी जजिल्हा परिषद निवडणुका फेब्रुवारीत! आयोगाच्यरिसोड तालुक्यात बूथ वाढ! जिल्हा परिषद, पंचायत

मेहकर हादरले! चिमुकलीचा मृतदेह मोकाट कुत्र्यांनी उकरून विद्रुप केला; शहरात खळबळ.

On: November 8, 2025 9:28 AM
Follow Us:

मेहकर /प्रतिनिधी (बुलडाणा): मेहकर शहरात घडलेली ही घटना ऐकून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मेहकर परिसरातील एका गरीब कुटुंबातील दीड वर्षांच्या चिमुकलीचा तापाने मृत्यू झाला.

कुटुंबाने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मेहकर येथील एका मोकळ्या जागेत तिच्यावर अंत्यविधी केला. मात्र खड्डा कमी खोलीचा असल्याने दुसऱ्याच दिवशी मोकाट कुत्र्यांनी मृतदेह उकरून विद्रुप केला. या घटनेने मेहकर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

७ नोव्हेंबरच्या सकाळी पीर मोहंमद उर्दू शाळेच्या मागील भागात, नगरपरिषद शौचालयाजवळ मानवी मृतदेहाचे तुकडे आढळल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

परिसरात क्षणात लोकांची गर्दी झाली आणि सुरुवातीला “अज्ञात आरोपींनी मुलीची हत्या केली” अशी अफवा पसरली. त्यानंतर मेहकर पोलिसांनी डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करून तपास सुरू केला.

तपासादरम्यान परिसरात अधिक पाहणी करण्यात आली असता खुल्या जागेत मृतदेह गाडलेला आढळला. चौकशीत ही मुलगी जानेफळ रोडवरील झोपडीत राहणाऱ्या गरीब भटक्या कुटुंबाची असल्याचे निष्पन्न झाले.

दीडवर्षीय चिमुकली गेल्या काही दिवसांपासून तापाने त्रस्त होती. उपचार सुरू असतानाच ६ नोव्हेंबरच्या रात्री तिचा मृत्यू झाला. आर्थिक अवस्था निकृष्ट असल्याने कुटुंबाने महानुभाव पंथीय मंदिराजवळील जागेत साधाच खड्डा खोदून अंत्यविधी केला.

मात्र खड्डा पुरेसा खोल नसल्याने रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांनी मिट्टी उकरून मृतदेह बाहेर काढला व त्याचे लचके तोडले. सकाळी लोकांच्या नजरेत हे भीषण दृश्य येताच परिसरात भीती, दु:ख आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या संपूर्ण घटनेने समाजात अनेक प्रश्न उभे केले आहेत. विशेषतः मोकाट कुत्र्यांचे वाढते प्रमाण, गरीब कुटुंबांना अंत्यसंस्कारासाठी सुरक्षित जागा उपलब्ध नसणे, आणि प्रशासनाची देखरेख याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

हे पण वाचा.

देऊळगाव राजात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा; पोलिसांची धडक कारवाई, सात युवक अटकेत.

सावरगाव डुकरे हादरलं! कुटुंबाचा अंत: मुलाने आई-वडिलांचा कुऱ्हाडीने खून करून स्वतः फाशी घेतली.

स्थानिकांची मागणी : नगरपरिषद आणि प्रशासनाने तातडीने मोकाट प्राण्यांवर नियंत्रण आणावे, गरीबांना अंत्यसंस्कारासाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून द्यावी.

मेहकर पोलिसांकडून दिलासा : “हा खून नसून एक दुर्घटना आहे,” असे पोलिसांनी स्पष्ट केले असून तपासाची नोंद बंद करण्यात आली आहे.

👉 आपल्या परिसरातही अशी समस्या असेल तर आम्हाला कळवा.
📩 Contact: kattanews.in@gmail.com
📰 ताज्या अपडेटसाठी KattaNews.in ला Visit करत राहा.

🔔 ताज्या लोकल ब्रेकिंग न्यूजसाठी – Kattanews.in नोटिफिकेशन ON करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!