हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
Ajanta Foundation Mumbai : अनित्य चैत्यभूमीवर तननाशक व किटकनगुंज गाव हादरले! फसवणुकीला कंटाळून शेतकरी पुरिठद येथे धक्कादायक प्रकार! दिवसा ढवळ्या शेतअंढेरा खून प्रकरण: आकाश चव्हाण हत्येतील तिघाहवा तपासत असताना समृद्धी महामार्गावर ट्रकखाअंढेरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई! ट्रॉली व र

Buldhana : बुलढाण्यात अवैध गर्भलिंग चाचणी रॅकेटचा पर्दाफाश; डॉक्टर ताब्यात

On: November 6, 2025 2:34 PM
Follow Us:

मंगेश भोलवणकर/ प्रतिनिधी

Buldhana : बुलढाणा शहरात अवैध गर्भलिंग निदान प्रकरणात जिल्हा प्रशासन व पोलिसांनी संयुक्तपणे मोठी धडक कारवाई केली आहे. महिला भ्रूणहत्येसारख्या समाज विघातक प्रथेला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली.

या धाडीत अवैध गर्भलिंग चाचणी चालविणाऱ्या केंद्राचा पर्दाफाश झाला असून संबंधित डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा शहरातील तार कॉलनी, सुंदरखेड परिसरात घराच्या चार भिंतीत गुप्त स्वरूपात गर्भलिंग चाचणी करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडे पोहोचली होती.

महिलांवर दबाव टाकून किंवा आर्थिक व्यवहारातून गर्भलिंग तपास केला जात असल्याच्या तक्रारी काही दिवसांपासून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात येत होत्या. त्यानंतर मिळालेल्या माहितीची पडताळणी करून कारवाईची आखणी करण्यात आली.

जिल्हा शल्य चिकित्सकांची टीम, स्थानिक आरोग्य विभाग, PCPNDT शाखा व पोलिसांनी संयुक्तपणे धाड घालत तपासणी केली. तपासादरम्यान काही वैद्यकीय उपकरणे, कागदपत्रे तसेच संशयित नोंदी जप्त करण्यात आल्या आहेत. संबंधित डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे.

या घटनेमुळे बुलढाणा शहरात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. समाजात मुलगा-मुलगी भेद संपुष्टात आणण्यासाठी शासन, प्रशासन आणि विविध सामाजिक संस्था सातत्याने जनजागृती करत असताना काही व्यक्तींनी आर्थिक फायद्यासाठी अशी गंभीर व अमानवी कृत्ये सुरू ठेवल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.

PCPNDT कायद्यानुसार गर्भलिंग चाचणी करणे हा गंभीर गुन्हा आहे. यासाठी कठोर शिक्षेची तरतूद असून या प्रकरणात देखील कायदेशीर कारवाई वेगाने सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच, या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्ती, क्लिनिक्स किंवा दलालांची साखळी तपासण्याचे कामही वेगाने सुरू आहे.

हे पण वाचा.

रात्री शेतात मुक्काम; सकाळी विहिरीत मृत! बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात खळबळ.

बुलढाणा : पाडळी रोडवर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत २७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू!

 

बुलढाणा जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी जनतेलाही आवाहन केले आहे की, अशा प्रकारचे अवैध प्रकार कोठेही सुरू असल्याची संशयास्पद माहिती मिळाल्यास त्वरित स्थानिक आरोग्य विभाग किंवा पोलिसांना कळवावी.

महिला भ्रूणहत्येला थांबवण्यासाठी समाजाने एकत्र येणे आवश्यक असून अशी कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

या प्रकरणाबाबत तुमचे मत काय? खाली कमेंटमध्ये लिहा…

👉 अशाच स्थानिक अपडेट्ससाठी Kattanews.in ला Follow करा.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!