हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

साखरखेर्डा परिसरात चोरट्यांचा हैदोस! दिवसाढवळ्या घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास; सवडद, पिंपळगाव सोनारा, हिवरा आश्रमात धुमाकूळ

On: August 21, 2026 5:17 AM
Follow Us:
sakharkherda-theft-buldhana-crime-news
साखरखेर्डा | समाधान सरकटे साखरखेर्डा परिसरात दिवसाढवळ्या घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सवडद, पिंपळगाव सोनारा आणि हिवरा आश्रम येथे घरांना लक्ष्य करून चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. सवडद येथील चोरीनंतर दोन संशयितांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून, इतर घटनांतील संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.

सवडद येथील श्रीकृष्ण अण्णाराव देशमुख यांच्या आई सुनंदाबाई या घराला कुलूप लावून मुलांना अंगणवाडीत घेऊन गेल्या होत्या. त्या घरी परतल्यानंतर घर उघडे असल्याचे दिसून आले. कपाटाची पाहणी केली असता कानातील सोन्याच्या बाळ्या, सेवनपीस, गहू पोत असा सुमारे चार तोळे सोन्याचा ऐवज, किंमत सहा लाख रुपये, तसेच ३० हजार रुपये रोख चोरीला गेल्याचे समोर आले.

चोरीच्या घटनेदरम्यान गावात भिक्षा मागण्यासाठी फिरणारा राज शेनफड शिंदे हा घरातून बाहेर पडताना पाच वर्षीय गौरी या चिमुकलीने पाहिल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर गावातील काही युवकांनी राज शेनफड शिंदे आणि त्याची पत्नी राधा यांचा शोध घेतला. दोघे गुंजमाथा शिवारात आढळून आल्यानंतर युवकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, संशयितांनी चोरीची कबुली दिलेली नसल्याची माहिती आहे.

दरम्यान, पिंपळगाव सोनारा येथे कडूबा पुंजाजी कुऱ्हाडे यांच्या घरात कोणी नसल्याची संधी साधून दोन दुचाकीस्वारांनी घराचे कुलूप तोडले. कपाटातील २० हजार रुपये रोख चोरून नेल्याचे समोर आले आहे.

हिवरा आश्रम येथे शिवाजी हिम्मतराव दळवी यांच्या घराला कुलूप असताना तीन दुचाकीस्वारांनी घरात प्रवेश करून ५० हजार रुपये रोख लंपास केल्याची माहिती आहे. पिंपळगाव सोनारा आणि हिवरा आश्रम येथील दोन्ही चोरीच्या घटनांमधील संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

याशिवाय कोराडी प्रकल्पातील दहा मोटारींच्या तांब्याच्या तारा चोरीला गेल्याचीही घटना समोर आली आहे. मागील महिनाभरापासून साखरखेर्डा परिसरात चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी झालेल्या काही चोरीच्या घटनांचा अद्याप शोध लागला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे दुय्यम ठाणेदार संदीप मेधने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपुरे कर्मचारी असल्याने तपासात दिरंगाई होत असल्याची चर्चा परिसरात आहे. वाढत्या चोरीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त वाढवावी आणि चोरीच्या घटनांचा तातडीने छडा लावावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सवडद चोरीप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित राज शेनफड शिंदे हा शेनफड शिंदे यांचा भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, संशयितांविरोधातील आरोपांची अंतिम पुष्टी तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच होणार आहे.

पोलिसांनी संबंधित घटनांचा तपास सुरू केला असून, पिंपळगाव सोनारा आणि हिवरा आश्रम येथील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे. चोरीला गेलेल्या मुद्देमालाबाबत आणि या घटनांचा परस्पर संबंध आहे का, याबाबत तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

📲 साखरखेर्डा आणि बुलढाणा परिसरातील ताज्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवा!

स्थानिक बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या kattanews च्या  WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

👉 WhatsApp ग्रुपमध्ये Join करा

हेही वाचा

टीप : या वृत्तातील संशयितांविषयीची माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. पोलिस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच आरोपांची अंतिम पुष्टी होईल.

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजात दोन गटांत हाणामारी, नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

कव्वाली संपली अन् वाद पेटला! देऊळगाव राजात दोन गटांत तुफान हाणामारी; शिवसेना नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

मतदार यादी विशेष कॅम्पची पाहणी करताना उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, सिंदखेड राजा

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात; सिंदखेड राजा मतदारसंघात ३-४ ऑक्टोबरला विशेष मतदार नोंदणी कॅम्प

साखरखेर्डा परिसरातील सोयाबीन आणि कपाशीच्या नुकसानीची पाहणी

“साहेब, काडही १० किलो भरत नाही; सोयाबीनचे दाणे कोठे शोधणार?” साखरखेर्डा परिसराततील शेतकऱ्यांची व्यथा

शेगावमध्ये जप्त करण्यात आलेल्या बनावट ५०० रुपयांच्या नोटा

शेगावमध्ये ५ लाखांच्या बनावट नोटांचा खेळ; ‘इंडियन चिल्ड्रेन बँक’च्या ९९९ नोटा जप्त

ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल झालेल्या शिंदी ग्रामपंचायतीचे कार्यालय, साखरखेर्डा

ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल, शिंदीत सरकारी जागा वैयक्तिक नावावर केल्याचा आरोप, न्यायालयाच्या आदेशानंतर साखरखेर्डा पोलिसांची कारवाई

माळसावरगाव शिवारात दुष्काळी नुकसानीची पाहणी करताना अधिकारी आणि शेतकरी नेते अयाज खान

माळसावरगाव शिवारात दुष्काळी पंचनाम्याला सुरुवात; “साहेब, सांगा आता शेतकऱ्यांनी जगायचं कसं?”

Leave a comment