हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

जिच्या कुशीत वाढला, तिच्याच डोक्यात घातली वीट! पाच हजारांसाठी मुलाचा आईवर हल्ला; देऊळगाव राजात गुन्हा दाखल

On: August 14, 2026 7:42 AM
Follow Us:
देऊळगाव राजात पाच हजार रुपयांसाठी आईवर वीट मारल्याची घटना

देऊळगाव राजा : मनोहर खंदारे 

जिच्या कुशीत वाढला, त्याच आईवर पाच हजार रुपयांसाठी मुलाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना देऊळगाव राजा परिसरातील पिंपळगाव चिलमखा शिवारात घडली. खर्चासाठी मागितलेले पाच हजार रुपये देण्यास असमर्थता दर्शविल्याने मुलाने आईला शिवीगाळ करून तिच्या डोक्यात वीट मारल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात महिला जखमी झाली असून, तिच्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कंगना लखन भोसले (रा. संजयनगर, देऊळगाव राजा) आणि रोहन लखन भोसले हे आई-मुलगा आहेत. कंगना भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास पिंपळगाव चिलमखा शिवारात रोहनने त्यांच्याकडे खर्चासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली.

मात्र, आपल्याजवळ पैसे नसल्याचे कंगना यांनी सांगितल्यानंतर रोहनने त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तेथे पडलेली वीट उचलून त्यांच्या डोक्यात मारल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या हल्ल्यात कंगना भोसले यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाला. घटनेनंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यांच्या तोंडी तक्रारीसह वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात मुलाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

पोलिस निरीक्षकांच्या आदेशानुसार हेडकॉन्स्टेबल संजय गोरे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, तक्रारीतील आरोपांची सत्यता पोलिस तपास आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेत निश्चित होणार आहे.

📲 KattaNews च्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ताज्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

टीप : या वृत्तातील माहिती पोलिस तक्रार आणि उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार आहे. तक्रारीतील आरोपांची अंतिम सत्यता पोलिस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर निश्चित होईल.

मनोहर खंदारे

मनोहर खंदारे हे कट्टा न्यूजचे प्रतिनिधी असून महाराष्ट्रातील स्थानिक, सामाजिक, राजकीय आणि ग्रामीण भागातील ताज्या घडामोडींवर बातम्या देतात. स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या समस्या आणि महत्त्वाच्या घटनांची अचूक व विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे ते काम करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी सिंदखेडराजा तहसीलसमोर नागपूर कराराची होळी करताना कार्यकर्ते

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी सिंदखेडराजा तहसीलसमोर नागपूर कराराची होळी

काटेपांग्री पाणी पुरवठा बंद असल्याने ओसाड पडलेला जलकुंभ

काटेपांग्री पाणी पुरवठा २५ दिवसांपासून बंद; वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्याचे काम ठप्प, ग्रामस्थ हैराण

डोणगाव पोलीस स्टेशन येथे आदिवासी समाज बांधवांचा घेराव आंदोलन

आरोपींना अटक होईपर्यंत जाणार नाही; नागेशवाडी प्रकरणावरून डोणगाव पोलीस ठाण्यात आदिवासी बांधवांचा ठिय्या

निलगायीच्या धडकेत अपघात झालेले शिवाजी धोंडूजी तुपकर

गुंज गावात हळहळ: निलगायीच्या धडकेत झालेल्या अपघातात जखमी मजुराचा अखेर मृत्यू

बुलढाणा दुष्काळ नुकसान भरपाई मागणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर एकनाथ शिंदे यांची भेट

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ नुकसान भरपाई मिळणार? आमदार खेडेकरांच्या मागणीनंतर शिंदेंचं मोठं आश्वासन

रताळी येथील शेतकरी पुत्र आकाश बळीराम पाटील आत्महत्या

दुष्काळ जाहीर होण्याच्या काही तास आधीच रताळीत शेतकरी पुत्राची आत्महत्या; शेतीचे नुकसान अन् कर्जाचा ताण

Leave a comment