हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

पेनटाकळी धरणात ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; रात्री घरातून निघाला, सकाळी मृतदेह आढळला

On: August 13, 2026 8:32 AM
Follow Us:
पेनटाकळी धरणात ३५ वर्षीय विष्णू राजेकर यांची आत्महत्या

साखरखेर्डा | प्रतिनिधी : समाधान सरकटे 

मेहकर तालुक्यातील पेनटाकळी धरणात ३५ वर्षीय तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ११ ऑगस्ट रोजी रात्री घडली. विष्णू तेजराव राजेकर असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे पेनटाकळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू राजेकर हे पेनटाकळी येथील रहिवासी होते. फाट्यावर त्यांचे हेअर सलूनचे दुकान होते. त्यांच्या पश्चात पत्नी, सहा वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.

११ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८ वाजता विष्णू राजेकर हे पत्नी आणि मुलांना काहीही न सांगता घरातून बाहेर पडले. त्यानंतर ते पेनटाकळी धरणाच्या दिशेने गेले.

धरणावर वॉचमन म्हणून ड्युटीवर असलेल्या वानखेडे यांच्या समोरच विष्णू यांनी धरणात उडी घेतली. ही घटना समोर आल्यानंतर त्याची माहिती पेनटाकळी गावात वाऱ्यासारखी पसरली. विष्णू यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर १२ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ९ वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक पेनटाकळी धरणावर दाखल झाले. पथकाने शोधमोहीम राबवत विष्णू राजेकर यांचा मृतदेह धरणातून बाहेर काढला.

या घटनेची तक्रार मृतकाचा चुलत भाऊ गजानन राजेकर यांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर दुय्यम ठाणेदार संदीप मेंधणे, लक्ष्मण इनामे, सुजित मेहर आणि योगेश जवजांळ यांनी घटनास्थळी पंचांच्या उपस्थितीत पंचनामा केला. याप्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास ठाणेदार युवराज रबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार कडूबा डोईफोडे करीत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करीत आहेत.

विष्णू राजेकर यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. दोन चिमुकल्या मुलांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपल्याने पेनटाकळी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

📲 KattaNews च्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

महाराष्ट्रातील ताज्या स्थानिक बातम्या आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

Join WhatsApp Group

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुट्टा तांड्याचा वैमानिक प्रशिक्षणार्थी स्वप्निल चव्हाण

वैमानिक होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले; बुट्टा तांड्याच्या २४ वर्षीय स्वप्निलचा अपघाती मृत्यू, सिंदखेड राजा तालुक्यात हळहळ

इब्राहिम बारुदवाला यांनी उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार यांची घेतलेली भेट

उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवारांची इब्राहिम बारुदवाला यांनी घेतली सदिच्छा भेट; बुलढाण्याच्या प्रश्नांवर झाली सविस्तर चर्चा

संघपाल पनाड आणि दिपक अंभोरे यांची रिपब्लिकन सेनेत नियुक्ती

रिपब्लिकन सेनेत मोठ्या नियुक्त्या; संघपाल पनाड जिल्हाध्यक्ष, दिपक अंभोरे तालुकाध्यक्ष

लोणार पिंपळनेर जिल्हा परिषद शाळेतील स्वच्छतागृहांची दुरवस्था

लोणारच्या पिंपळनेर शाळेतील स्वच्छतागृहांची अवस्था पाहून धक्का; विद्यार्थ्यांसाठी सुविधा की आजारांचे घर?

सिनगाव जहांगीर येथे अवैध रेती वाहतुकीप्रकरणी जप्त केलेले दोन टिप्पर

पहाटे ३ वाजता महसूल पथकाची धडक; सिनगाव जहांगीरमध्ये दोन टिप्पर जप्त, रेतीमाफियांमध्ये खळबळ

बुलढाणा जिल्हा बँक निवडणूक मनोज कायंदे परिवर्तन पॅनल

बुलढाणा जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय भूकंप? शिंगणे-जाधवांच्या ‘सहकार’विरोधात दंड थोपटत मनोज कायंदेंचा ‘परिवर्तन’ पॅनल मैदानात

Leave a Comment