हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

चिखलीत संतापाचा उद्रेक! 24 तासांत आरोपींना अटक नाही तर भव्य निषेध मोर्चा

On: July 8, 2026 10:33 AM
Follow Us:
चिखलीतील शेलगाव जहागीर मारहाण प्रकरणात कारवाईच्या मागणीसाठी निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते

प्रतिनिधी | चिखली |विशाल गवई 

चिखली तालुक्यातील शेलगाव जहागीर येथे घडलेल्या कथित मारहाण प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील पीडित उषा रमेश साळवे यांच्या कुटुंबीयांची सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट घेत न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन 24 तासांच्या आत संबंधित आरोपींना अटक करावी, तसेच कायद्यानुसार योग्य कलमांखाली कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. संबंधित जमीन वादाचीही निष्पक्ष चौकशी करून पीडितेला न्याय द्यावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.

सामाजिक कार्यकर्ते दिलीप भाई खरात यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देत सांगितले की, “24 तासांत योग्य कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रातील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांसह संबंधित पोलीस ठाण्यावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात येईल.”

या प्रकरणात काही गंभीर आरोपही करण्यात आले असून, त्यांची सत्यता तपासणे आणि कायदेशीर कारवाई करणे हे संबंधित तपास यंत्रणांचे काम असल्याचेही उपस्थितांनी नमूद केले.

यावेळी प्रकाश भाई धुडळे, सिद्धांत वानखेडे, प्रा. पठाण सर, दिलीप काकडे सर, वंदना वाघ, हिम्मतराव जाधव, संदीप गवई, प्रकाश पाटील, अशोक खरात, सचिन भाऊ, परमेश्वर साळवे, सलीम पठाण, राणा मोरे, आश्विन लहाने यांच्यासह शेकडो भीमसैनिक उपस्थित होते.

या प्रकरणाबाबत पोलीस प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.


👉 KattaNews.in वाचकांसाठी

महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज, गुन्हे, शेती, सरकारी योजना, राजकारण आणि स्थानिक घडामोडींचे अचूक अपडेट्स मिळवण्यासाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या.


Related News

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक निवडणुकीत 94 टक्के मतदान

Buldhana News: बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेसाठी 94% मतदान; आज निकाल, कोण बाजी मारणार ? संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

Chikhli Buldhana News पिस्टलसह सराईत गुन्हेगार ताब्यात

चिखली पोलिसांची मोठी कारवाई! सराईत गुन्हेगार पिस्टलसह ताब्यात; ₹45 हजारांचे अग्नीशस्त्र जप्त

शिंदीच्या निलेश खरात यांची कतार एअरवेजमध्ये निवड

शिंदीच्या छोट्या गावातून थेट कतार एअरवेजमध्ये झेप; निलेश खरातने मेहनतीच्या जोरावर साकारले आकाशात उडण्याचे स्वप्न

शेतकरी कर्जमाफीसाठी रविकांत तुपकरांचा २७ ऑगस्टला मुंबईत आंदोलनाचा इशारा

शेतकरी कर्जमाफीसाठी रविकांत तुपकरांचा एल्गार; २७ ऑगस्टला मुंबईत मंत्र्यांचे बंगले-गाड्या जप्त करून लिलावाचा इशारा

Buldhana News घरकुल लाभार्थी यादीवर हरकत सिंदखेड राजा

Buldhana News: घरकुल लाभार्थी यादीवर हरकत; सिंदखेड राजा तालुक्यात सखोल चौकशीची मागणी

Maharashtra News सुटे खाद्यतेल विक्रीवर बंदी तुकाराम मुंढे

खाद्यतेल विक्रीबाबत मोठा निर्णय! तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये; सुटे तेल विकण्यास बंदी, नियम मोडल्यास कठोर कारवाई

Leave a Comment