हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

एकाच रात्री दोन ज्वेलर्स दुकाने फोडली; 1.43 लाखांचा ऐवज लंपास, चोरट्यांचा शोध सुरू

On: June 30, 2026 8:35 AM
Follow Us:
जानेफळ येथे दोन ज्वेलर्स दुकाने फोडून 1.43 लाखांचे चांदीचे दागिने चोरी

जानेफळ | प्रतिनिधी : कट्टा न्यूज 

बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ येथे अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री दोन ज्वेलर्स दुकाने फोडून 1 लाख 43 हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्य रस्त्यालगत असलेल्या या दोन्ही दुकानांमध्ये चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

देऊळगाव साकर्शा मार्गावरील साईराम ज्वेलर्स आणि त्याच परिसरातील माऊली ज्वेलर्स या दोन दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केले. मध्यरात्रीच्या सुमारास दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्यात आला. त्यानंतर दुकानांतील सुमारे 681 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने चोरी करून चोरटे पसार झाले. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 1 लाख 43 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी दुकान मालक दीपक आग्रोया आणि हिम्मतराव आवले यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ठसे तज्ज्ञ, फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथकाला घटनास्थळी पाचारण केले.

उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. पुढील तपास ठाणेदार शरद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत आहेत.

एकाच रात्री दोन ज्वेलर्स दुकाने फोडल्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. बाजारपेठेत सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करण्याबरोबरच रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी स्थानिक व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.


👉 Kattanews.in वाचा, सत्य आणि वेगवान बातम्यांसाठी कायम जोडलेले रहा.

स्थानिक, गुन्हे, राजकीय, शेती, रोजगार, सरकारी योजना आणि ब्रेकिंग न्यूजचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या आणि आपल्या मित्र-परिवारासोबत ही बातमी शेअर करा.


संबंधित बातम्या

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

संजय गायकवाड श्वेता महाले यांच्यावर चिखलीच्या परिस्थितीवरून टीका करताना

‘चिखलीला गाझियाबादपेक्षाही भयानक करून ठेवलं’; श्वेता महालेंवर संजय गायकवाडांचा जोरदार पलटवार

चारा छावण्या सुरू करण्याची मागणी करताना चिखलीत शिवाजीराव देशमुख व शिवसैनिक तहसीलदारांना निवेदन देताना

चारा छावण्या सुरू करा : पावसाअभावी बुलढाणा जिल्ह्यात चारा संकट तीव्र, शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन

डोणगाव दुष्काळामुळे लोणी गवळी परिसरात करपलेले पीक

डोणगाव-लोणी गवळीतील पिके करपली, शेतकरी संकटात; पालकमंत्र्यांनी बांधावर येऊन पाहणी करावी, प्रशांत पाटील यांची मागणी

बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी राहुलभाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वात निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा

“सर्वेचे फार्स नको, बुलढाणा जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करा”; राहुलभाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा मोर्चा

पीक पेरा ऑनलाइनच्या घोळामुळे भूमी अभिलेख कार्यालयात ठिय्या देणारे भरोसा भाग-१ व काळोना येथील शेतकरी

पीक पेरा ऑनलाइनचा तांत्रिक घोळ कायम; भरोसा भाग-१ व काळोना येथील शेतकरी आक्रमक, भूमी अभिलेख कार्यालयात ठिय्या

देऊळगाव राजा पत्रकार संघटनांचे पदाधिकारी तहसीलदारांना निवेदन देताना

देऊळगाव राजा पत्रकार संघटना आक्रमक: समाजमाध्यमांवरील बदनामीकारक मजकुराविरोधात तहसीलदारांना निवेदन, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Leave a comment