दिवाळी जाहिरात बुकिंग - KattaNews.in
📢 KattaNews.in जाहिरात सेवा
आपल्या व्यवसायाची जाहिरात आजच द्या!
लाखो लोकांपर्यंत पोहोचवा!
दुकाने • हॉस्पिटल • क्लासेस • हॉटेल • स्थानिक व्यवसाय
✅ जाहिरातीसाठी WhatsApp वर संपर्क करा
KattaNews.in
KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात सेवा
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

अवकाळी पावसाचा कहर! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार संजू गायकवाड; प्रशासनाला तातडीचे आदेश

On: June 29, 2026 12:23 PM
Follow Us:
मोताळा तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेताची पाहणी करताना आमदार धर्मवीर संजू गायकवाड.

मोताळा,प्रतिनिधी | प्रविण गरुडे

मोताळा तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. तपोवन, काळेगाव, सारोळा मारोती आणि सारोळा पीर परिसरातील सोयाबीन, कापूस, मका, भाजीपाला तसेच इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पिके आडवी पडली आहेत. काही शेतकऱ्यांच्या घरांचे, गोठ्यांचे आणि शेतीपयोगी साहित्याचेही नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

या पार्श्वभूमीवर आमदार धर्मवीर संजू गायकवाड यांनी नुकसानग्रस्त गावांना भेट देत शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत नुकसानाची पाहणी केली. “कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

यावेळी तहसीलदार सौ. सारिका, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक तसेच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना तातडीने पारदर्शक पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने विलंब न करता कार्यवाही करावी, असेही आमदार गायकवाड यांनी सांगितले.

या पाहणी दौऱ्यात शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


👉 Kattanews.in वाचा – आपल्या परिसरातील ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात वेगवान बातम्यांसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा.

Related News

 

प्रवीण गरुडे

प्रवीण गरुडे हे Kattanews.in चे अनुभवी प्रतिनिधी असून ग्रामीण, सामाजिक, शिक्षण आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांचे अचूक व विश्वासार्ह वार्तांकन करतात. प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीवर आधारित बातम्या सादर करणे ही त्यांची ओळख आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्न, ग्रामीण भागातील समस्या आणि सार्वजनिक हिताचे विषय प्रभावीपणे मांडण्यावर त्यांचा विशेष भर असतो. सत्यता, वेग आणि जबाबदारी या पत्रकारितेच्या मूल्यांना प्राधान्य देत ते सातत्याने वाचकांपर्यंत बातम्या पोहोचवत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

अर्जुन इंगळे यांच्या ३४ वर्षांच्या नगरपालिका सेवाकाळाबाबत आणि बदली अहवालावरून उपस्थित झालेल्या प्रश्नांवरील बातमीचे थंबनेल.

३४ वर्षे एकाच नगरपालिकेत नोकरी, बदलीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल; नगरविकास विभागाच्या भूमिकेवर सवाल

श्री बालाजी महाराज यात्रा निमित्त देऊळगाव राजा नगरपरिषद हॉलमध्ये शांतता समितीची बैठक

‘श्री बालाजी महाराज यात्रेला गालबोट लागू देऊ नका’; डॉ. शशिकांत खेडेकर यांचे पोलीस उपअधीक्षक अमोल गायकवाड यांना निर्देश

लोणार उपोषण स्थगित, पोलीस ठाण्यासमोर चर्चा करताना शिवसेना (उबाठा) पदाधिकारी व पोलीस अधिकारी

लोणार उपोषण स्थगित: पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर अवैध दारू, गुटखा, मटक्याविरोधात १० दिवसांची मुदत

चिखलीतील तलाठी पियुष गायकवाड यांच्या आत्महत्येची बातमी

अवघ्या २६ व्या वर्षी जीवनप्रवास थांबला; चिखलीतील तरुण तलाठी पियुष गायकवाड यांची आत्महत्या

बुलढाणा जिल्हा परिषद लाचप्रकरण ACB कारवाई

बुलढाणा जिल्हा परिषदेत ACB ची धडक कारवाई; लाच मागितल्याच्या आरोपावरून तांदूळकर आणि खर्चे या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई

देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ आणि अंढेरा परिसरातील धरणांवरील पाणी उपशाच्या तपासणीची मागणी

देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ, अंढेरा परिसरातील धरणांवर पाणी उपशाचे नियंत्रण कोण ठेवणार? भरारी पथकाच्या तपासणीची मागणी

Leave a comment