हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मेहुनाराजा हादरले! ७२ वर्षीय वृद्धाची घरासमोरील अंगणात गळफास घेऊन आत्महत्या

On: June 2, 2026 3:27 PM
Follow Us:
मेहुनाराजा येथे ७२ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

देऊळगाव राजा | समाधान सरकटे 

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुनाराजा येथे एका ७२ वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. गुरुवारी (२९ मे) ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून देऊळगाव राजा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेहुनाराजा येथील रहिवासी तुकाराम महादू कदम (वय ७२) यांनी आपल्या राहत्या घरासमोरील अंगणात टिनपत्राच्या शेडला आधार देणाऱ्या लाकडी बल्लीस दोरी बांधून गळफास घेतला. ही घटना २९ मे रोजी पहाटे ३ वाजण्यापूर्वी घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. मृताचे पुत्र मुकुंदराव तुकाराम कदम (वय ४२) यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली.

त्यांच्या तोंडी फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून मर्ग क्रमांक २३/२०२६ कलम १९४ बीएनएसएस अंतर्गत प्रकरण दाखल केले आहे. घटनेची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल नायबराव मोगल यांनी केली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद साळवे करीत आहेत.

दरम्यान, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून सर्व बाबींची चौकशी करण्यात येत असून तपासानंतर अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.


वाचकांसाठी महत्त्वाचे : मानसिक तणाव, नैराश्य किंवा आत्महत्येचे विचार येत असल्यास त्वरित कुटुंबीय, मित्र किंवा तज्ज्ञ समुपदेशकांची मदत घ्या. योग्य वेळी मिळालेली मदत जीव वाचवू शकते.


Related News


हे आवश्यक करा… बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भातील ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी अपडेट्ससाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

chikhli-couple-knife-attack-buldhana-kattanews.webp

अंगणातील क्षुल्लक वाद जीवावर बेतला; चिखलीत दाम्पत्यावर चाकूने जीवघेणा हल्ला

SIR Form 2026 Maharashtra voter list update process

SIR फॉर्म घरबसल्या 5 मिनिटांत कसा भरायचा? BLO घरी येणार, Part Number शोधण्यापासून स्वाक्षरीपर्यंत संपूर्ण माहिती

साखरखेर्डा ग्रामसभेत क्रीडांगणासाठी सरकारी जमीन राखीव ठेवण्याचा एकमुखी ठराव मंजूर

साखरखेर्डा मधील क्रीडांगणावर अखेर शिक्कामोर्तब! ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर; युवकांनी फटाके फोडून केला जल्लोष

₹25 हजारांची लाच घेताना पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप मोरे ACB च्या जाळ्यात

₹25 हजारांची लाच घेताना पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप मोरे ACB च्या जाळ्यात; विकासकामांच्या बिलासाठी मागितले होते 3% कमिशन

महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी; शासनाचे नवे परिपत्रक

मोठी घोषणा! महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी; शासनाने काढले नवे परिपत्रक

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचे पोलीस शिपाई चंद्रनिलकांत सोनुने यांनी मुंबईतील 80 वर्षीय महिलेला मदत केल्यानंतर त्यांचा गौरव करण्यात आला.

मुंबईत 80 वर्षीय आजीला दिला आधार; चिखलीच्या पोलीस शिपाई चंद्रनिलकांत सोनुने यांच्या माणुसकीची सर्वत्र चर्चा

Leave a Comment