हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

सिंदखेडराजात रेशन धान्य वाटपावर प्रश्नचिन्ह; तीन महिन्यांपासून धान्य मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार

On: May 31, 2026 9:45 AM
Follow Us:
सिंदखेडराजा येथील रेशन धान्य वितरणाबाबत नागरिकांची तक्रार

बुलढाणा | विशाल गवई

सिंदखेडराजा शहरातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 15002500284 संदर्भात रेशनधारकांनी गंभीर तक्रार दाखल केल्याने सार्वजनिक वितरण व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. मागील तीन ते चार महिन्यांपासून तसेच मे महिन्याचे रेशन धान्य मिळाले नसल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला असून याप्रकरणी तहसील कार्यालयात लेखी निवेदन देण्यात आले आहे.

सिंदखेडराजा शहरातील काही रेशनधारकांनी संबंधित स्वस्त धान्य दुकान चालकाविरोधात तक्रार करत धान्य वाटपात अनियमितता होत असल्याचा आरोप केला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा दुकानावर जाऊनही धान्य मिळत नसल्याने त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

तक्रारदार रामेश्वर आत्रासाहेब वानखेडे यांनी मागील दोन महिन्यांसह मे महिन्याचे धान्य मिळाले नसल्याचे नमूद केले आहे. तसेच विजय सुदाम भालमोडे यांनीही मे महिन्याचे रेशन धान्य अद्याप मिळाले नसल्याची तक्रार केली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “माल संपला आहे”, “दोन दिवसांनी या”, “शासनाकडून माल आलेला नाही” अशी कारणे देऊन वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप आहे.

काही लाभार्थ्यांनी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता “मी शेतात आहे”, “दवाखान्यात आहे” अशी कारणे सांगितली जात असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात धान्य वाटप होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुकानासमोर थांबूनही संबंधित दुकानदार उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः गरीब व गरजू कुटुंबांना याचा फटका बसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

तक्रारीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. दुकानावर किती धान्य प्राप्त झाले आणि किती धान्य वाटप करण्यात आले याबाबतची माहिती दर्शविणारा फलक नियमितपणे लावला जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे वितरण प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

“गरीब आणि गरजू नागरिकांना शासनाच्या योजनांमधून मिळणारे धान्य वेळेवर मिळणे आवश्यक आहे. वारंवार फेऱ्या मारूनही धान्य मिळत नसेल तर प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी,” अशी प्रतिक्रिया काही रेशनधारकांनी व्यक्त केली.

दरम्यान, संबंधित दुकानदाराविरोधातील तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून लाभार्थ्यांना थकीत धान्य तातडीने वितरित करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच योग्य कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या तक्रारीची प्रत महसूल मंत्री, जिल्हाधिकारी बुलढाणा, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा यांना पाठविण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाची नोंद : या वृत्तातील आरोप तक्रारदारांनी प्रशासनाकडे दिलेल्या लेखी तक्रारीवर आधारित आहेत. संबंधित दुकानदारांची अधिकृत बाजू प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.


आपले मत आम्हाला कळवा

आपल्या परिसरातील समस्या, बातम्या किंवा घडामोडींची माहिती KattaNews.in ला पाठवा. सत्य आणि जनहिताच्या बातम्यांना आम्ही नेहमीच प्राधान्य देतो.

Related News

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलढाण्यात एसटी स्थानकाच्या 200 मीटर परिसरात RTO आणि पोलिसांची वाहन जप्ती कारवाई

एसटी स्थानकाच्या 200 मीटरमध्ये वाहन लावलं? थेट जप्ती; बुलढाण्यात RTO-पोलिसांची धडक कारवाई, 270 वाहनांवर Action

सिंदखेडराजा येथे SIR प्रक्रियेच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे

SIR कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; सिंदखेडराजात जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांचा कडक इशारा

देऊळगाव राजात SC आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात काढण्यात आलेला विराट जनआक्रोश मोर्चा

देऊळगाव राजात SC आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात विराट जनआक्रोश; हजारोंचा मोर्चा, सरकारसमोर ७ प्रमुख मागण्या

नांदुरा येथील पूर्णा नदीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पूर्णा नदीत पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू; नांदुर्यात शोककळा

साखरखेर्डा गट क्रमांक 870 जमीन प्रकरणात क्रीडांगणाची पाहणी करताना माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

साखरखेर्डा गट नं. 870 जमीन प्रकरण गाजले; बनावट फेरफार, भूमाफियांचा डाव? महसूल कलम 155 अंतर्गत कारवाईची मागणी

देऊळगाव राजा येथे पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान व अन्नदान करताना

देऊळगाव राजात सेवाभावाचा आदर्श! पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान, अन्नदानाने जिंकली मने

Leave a Comment