हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

बुलढाण्यात रायपूर पोलिसांची मोठी कारवाई; 2 पिस्तूल, 94 काडतुसे आणि XUV500सह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

On: May 21, 2026 2:21 PM
Follow Us:
अंत्रीकोळी येथे रायपूर पोलिसांनी जप्त केलेली पिस्तूल, काडतुसे आणि XUV500 वाहन

चिखली, प्रतिनिधी| विशाल गवई 

बुलढाणा जिल्ह्यातील अंत्रीकोळी येथे रायपूर पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आंतरजिल्हा टोळीवर छापा टाकत पोलिसांनी 2 देशी पिस्तूल, 94 काडतुसे, महिंद्रा XUV500 वाहन, आयफोन मोबाईलसह तब्बल 7 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रायपूर पोलीसांनी ही कारवाई केली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 18 मे 2026 रोजी ग्राम अंत्रीकोळी येथे पंचासमक्ष छापा टाकण्यात आला.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी शुभम सागर पवार (रा. वर्धा), रुपेश मिलन शिंदे आणि रोहेल मिलन शिंदे (मूळ रा. जालना, सध्या जळगाव) या तिघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून 2 देशी बनावटीची पिस्तूल, 4 मॅगझीन, 92 जिवंत काडतुसे, 2 वापरलेली काडतुसे, लोखंडी चाकू, महिंद्रा XUV500 वाहन तसेच आयफोन 16 प्रो मॅक्स मोबाईल जप्त करण्यात आला.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 7 लाख 5 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अवैध शस्त्र व्यवहाराचा मोठा पर्दाफाश झाल्याचे मानले जात आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनंत कळमकर यांच्या फिर्यादीवरून रायपूर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमातील विविध कलमांनुसार तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली पोहेका दशरथ शितोळे, ज्योती गलबले, राहुल जाधव, अनंत कळमकर, अख्तर शेख, लक्ष्मण शिंदे, चालक सागर कोरडे तसेच दहशतवाद विरोधी पथक, अकोला यांनी संयुक्तपणे पार पाडली.

सध्या या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार निलेश सोळंके आणि पोलीस कर्मचारी लक्ष्मण शिंदे हे करत आहेत. या टोळीचे आणखी काही संबंध इतर जिल्ह्यांमध्ये आहेत का, याचाही तपास पोलीसांकडून सुरू करण्यात आला आहे.


वाचकांसाठी महत्त्वाचे

स्थानिक बातम्या, क्राइम अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या घडामोडी सर्वात आधी वाचण्यासाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या.


Related News

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजा दुहेरी हत्याकांड प्रकरणातील पोलीस कारवाई

देऊळगाव राजा दुहेरी हत्याकांडाला नवे वळण; दोन FIR, दोन मृत्यू अन् सर्व आरोपींना 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

बुलढाण्यात खामगाव रोडवरील रॉयल एनफिल्ड गोडाऊनला लागलेली आग

बुलढाण्यात रॉयल एनफिल्ड गोडाऊनला भीषण आग; बुलेटसह स्पेअर पार्ट्स जळाले, १५ लाखांच्या नुकसानीचा अंदाज

लोणार तहसील कार्यालयात रेशन कार्डच्या नाव कमी करण्यासाठी शुल्क आकारल्याचा आरोप

लोणार तहसीलमध्ये रेशन कार्डमधून नाव कमी करण्यासाठी १०० रुपये? शासन शुल्क १० रुपये असल्याचा दावा; चौकशीची मागणी

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार संजुभाऊ गायकवाड यांची भेट

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार संजुभाऊ गायकवाड यांची सस्नेह भेट; शेतकरी प्रश्नांवर चर्चा

अंत्री खेडेकर येथे शेतमजुरावर बिबट्याचा हल्ला

शेतात पाणी काढताना बिबट्याचा शेतमजुरावर अचानक हल्ला; जीव वाचवण्यासाठी विहिरीत उडी

सिंदखेडराजा-मेहकर मार्गावरील पळसखेड चक्का येथे झालेला भीषण अपघात

सिंदखेडराजा-मेहकर मार्गावर भीषण अपघात; पुलावरून मोटरसायकल खाली कोसळली, चालकाचा जागीच मृत्यू

Leave a comment