हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

बुलढाणा तणावग्रस्त! आमदार संजय गायकवाडांच्या घराबाहेर आंदोलन उफाळलं; पोलिसांशी झटापट, अनेक जण ताब्यात

On: April 28, 2026 2:13 PM
Follow Us:
बुलढाणा येथे गायकवाड यांच्या घराबाहेर आंदोलन आणि पोलिस बंदोबस्त

बुलढाणा |विशाल गवई 

बुलढाण्यात आज वातावरण अक्षरशः तणावपूर्ण बनलं आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या घराबाहेर अचानक मोठ्या संख्येने आंदोलक जमा झाले आणि जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात झाली. ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादाने आता उग्र स्वरूप धारण केलं असून आंदोलकांचा संताप रस्त्यावर उसळल्याचं स्पष्ट दिसत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आणि आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला.

आंदोलनादरम्यान काही वेळातच परिस्थिती चिघळली आणि आंदोलक व पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर ही वादाची ठिणगी झटापटीत बदलली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तत्काळ कारवाई करत काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. विशेष म्हणजे या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांचाही सहभाग होता, ज्यामुळे परिस्थिती अधिक संवेदनशील बनली होती.

या संपूर्ण प्रकरणाचं मूळ ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाशी संबंधित आहे. या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत तांबे यांच्याशी फोनवरून झालेल्या कथित वादग्रस्त संभाषणानंतर हा वाद अधिकच चिघळला. या घटनेनंतर विविध संघटना आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी गायकवाड यांच्या विरोधात आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

दरम्यान, पोलिसांनी परिस्थिती हाताळण्यासाठी कठोर पावलं उचलली असून काही आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. तसेच प्रकाशक प्रशांत तांबे आणि त्यांच्या पत्नीला देखील स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. संभाव्य तणाव लक्षात घेता पोलिस प्रशासन पूर्णपणे सतर्क असून परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

एकंदरीत, बुलढाण्यातील ही घटना केवळ स्थानिक स्तरावर मर्यादित न राहता राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे. येत्या काही तासांत या प्रकरणाला आणखी वेगळं वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.


📢 तुमचं मत काय?

या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत आम्हाला नक्की कळवा. अशा ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या kattanews.in या न्यूज वेबसाइटला नियमित भेट द्या.


🔗 संबंधित बातम्या

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

Leave a Comment