लोणार (दि. २८ एप्रिल २०२६): विनायक कुटे
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर वातावरण तापले असून आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या समर्थनार्थ शिवप्रेमींनी मोठ्या उत्साहात भव्य दुग्धाभिषेक सोहळा पार पाडला. या कार्यक्रमात शेकडो कार्यकर्ते, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. “छत्रपतींचा अपमान सहन केला जाणार नाही” या ठाम भूमिकेमुळे हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला आहे.
धर्मवीर युथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित या सोहळ्यात आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करून त्यांच्या भूमिकेला जोरदार समर्थन दर्शवण्यात आले. यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान कायम राखण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान संबंधित प्रकाशकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. “छत्रपतींच्या नावाचा कोणताही अवमान सहन केला जाणार नाही” असा एकमुखी निर्धार उपस्थित शिवप्रेमींनी व्यक्त केला. राज्यभर गुन्हे दाखल करण्याची मागणीही यावेळी जोर धरताना दिसली.
या सोहळ्यात घोषणाबाजी, जयघोष आणि भगव्या पताकांनी परिसर दुमदुमून गेला. संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी छत्रपतींच्या सन्मानासाठी एकत्र येत आपली भूमिका ठामपणे मांडली.
कार्यक्रमासाठी धर्मवीर युथ फाउंडेशन, किसान सेना तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेली निष्ठा, आदर आणि अस्मिता पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसून आली.
📢 हे आवश्यक करा..
👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.
👉 ही बातमी शेअर करा आणि तुमचे मत नक्की कळवा.
📰 Related News










