हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

माणुसकी अजून जिवंत! हरवलेली 1.25 लाखांची सोन्याची पोत प्रामाणिकपणे परत

Follow Us:
रिसोड धोडप बु. सोन्याची पोत परत प्रामाणिकपणा माणुसकी

रिसोड|वाशिम, प्रतिनिधी

प्रामाणिकपणा  शब्दांना खऱ्या अर्थाने न्याय देणारी एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. हरवलेली तब्बल 1 लाख 25 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत प्रामाणिकपणे परत केल्यामुळे आजही समाजात माणुसकी जिवंत असल्याचा दिलासा मिळाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात समाधानाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील धोडप बु. गावात राहणाऱ्या वयोवृद्ध सखुबाई साबळे यांची अंदाजे 8 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत रात्रीच्या सुमारास हरवली होती. वयोमानामुळे आधीच असुरक्षित वाटणाऱ्या सखुबाई यांना या घटनेमुळे मोठा मानसिक धक्का बसला होता.दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेचे अध्यक्ष भारत बाजड यांच्या पत्नी गोदावरी बाजड यांच्या निदर्शनास ही सोन्याची पोत आली. त्यांनी कोणताही लोभ न बाळगता लगेच गावात चौकशी सुरू केली.

तपासाअंती ही पोत सखुबाई साबळे यांचीच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गोदावरी बाजड यांनी अत्यंत प्रामाणिकपणे ती पोत सखुबाई यांच्या स्वाधीन केली. हरवलेली मौल्यवान वस्तू परत मिळाल्यामुळे सखुबाई यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

त्यांनी गोदावरी बाजड यांचे मनापासून आभार मानले. या घटनेमुळे संपूर्ण गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, आजच्या काळातही अशी प्रामाणिक माणसं आहेत याचा प्रत्यय सर्वांना आला.

गोदावरी बाजड यांच्या या कृतीमुळे समाजात प्रामाणिकतेचा आणि माणुसकीचा आदर्श निर्माण झाला आहे. ही घटना अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

👉 अशा सकारात्मक आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.

📲 ही बातमी आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा आणि माणुसकीचा संदेश पुढे पोहोचवा.

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

समृद्धी महामार्ग हॉटेल आग - दुसरबीड येथील रमावि हॉटेलमधून निघणारा धूर

समृद्धी महामार्गावर हॉटेलला दुसरबीडजवळ रमावि हॉटेलमध्ये अचानक आग; शॉर्टसर्किटमुळे धुराचे लोट, सुरक्षा बल-क्युआरव्ही पथक धावले

साखरखेर्डा येथे अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान करताना भाजपचे मान्यवर

साखरखेर्ड्यात अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा सन्मान; पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा उपक्रम

दहावी बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक २०२७ पाहताना महाराष्ट्रातील विद्यार्थी

दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर! पाहा, परीक्षा कधीपासून सुरू होणार

सिंदखेडराजा ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती ४३ गावांची यादी

सिंदखेडराजातील ४३ ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासक! पाहा गावनिहाय नियुक्तीची संपूर्ण यादी

Leave a Comment