हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

धमकी, बदनामी आणि तुटलेलं लग्न… २१ वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य; जळगाव जामोद हादरलं

On: April 7, 2026 1:23 PM
Follow Us:
जळगाव जामोद येथे मानसिक छळामुळे तरुणीची आत्महत्या

जळगाव जामोद (बुलढाणा) |७ एप्रिल २०२६

मानसिक छळ, धमक्या आणि समाजात होणाऱ्या बदनामीच्या भीतीमुळे एका २१ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना पळशी सुपो येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातीलच गौरव पुरुषोत्तम खंडाळे (वय २२) हा गेल्या काही दिवसांपासून संबंधित तरुणीला सतत त्रास देत होता. “माझ्याशीच लग्न कर, नाहीतर आपले फोटो तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवेन,” अशी धमकी तो वारंवार देत होता. या धमक्यांमुळे तरुणी मानसिकदृष्ट्या खचली होती.

दरम्यान, आरोपीच्या या कृत्यांमुळे तरुणीचे ठरलेले लग्नही मोडले. शनिवारी (४ एप्रिल) सासरच्या मंडळींनी घरी येऊन लग्नाचा संबंध तोडल्याचे स्पष्ट केले. भरल्या घरातून लग्न मोडल्याने आणि सततच्या मानसिक छळामुळे तरुणी पूर्णपणे खचून गेली होती.

समाजात होणारी बदनामी आणि आरोपीकडून सुरू असलेला त्रास असह्य झाल्याने तिने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ऐन तारुण्यात एका मुलीने अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी मृतक तरुणीचे काका ज्ञानेश्वर शामराव कोकाटे (वय ४७) यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गौरव खंडाळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ आणि ३५१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपीला लवकरच अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


👉 Related News


👉 तुमच्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी

Kattanews.in ला नियमित भेट द्या आणि आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजात दोन गटांत हाणामारी, नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

कव्वाली संपली अन् वाद पेटला! देऊळगाव राजात दोन गटांत तुफान हाणामारी; शिवसेना नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

चिखली भाजप नगरसेवकाची रस्त्याच्या निधीसाठी बॅनरबाजी

‘मी सिमेंट रोड बोलतोय…’; चिखलीत भाजप नगरसेवकाची अनोखी बॅनरबाजी, रस्त्याच्या निधीच्या मागणीने राजकीय चर्चांना उधाण

बुलडाण्यातील भाजप-शिवसेना संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड

“मुख्यमंत्र्यांच्या नावाने वसुली होतेय?”; “आरोप खोटा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन” बुलडाण्यातील भाजप-शिवसेना संघर्षात संजय गायकवाडांचा मोठा दावा

श्री व्यंकटेश महाविद्यालयात गांधीजी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान

श्री व्यंकटेश महाविद्यालयात गांधीजी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान; सत्य, अहिंसा आणि मूल्यनिष्ठेचा जागर

देऊळगाव राजा श्री बालाजी महाराज यात्रा उत्सव २०२६

देऊळगाव राजा श्री बालाजी महाराज यात्रा उत्सवाला ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ; २० ऑक्टोबरला दसरा पालखी मिरवणूक

अंढेरा घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुण्याहून हिवरखेडकडे निघाला, पण अंढेरा घाटात काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू.

Leave a comment