हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

येवतीत अवैध रेती जप्त; तहसीलदारांच्या पुढाकाराने घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाटप

Follow Us:
येवती येथे अवैध रेती जप्त करून घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाटप करताना महसूल प्रशासन

येवती (ता. रिसोड, जि. वाशीम) |२० फेब्रुवारी २०२६

अवैध रेती जप्ती कारवाई करत महसूल प्रशासनाने सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. येवती येथे अवैध रेती जप्त करून ती घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आली. तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गरजू कुटुंबांना दिलासा मिळाला असून महसूल विभागाच्या कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रिसोड तालुक्यातील येवती येथील गट क्रमांक ३४२ मधील सरकारी ई-क्लास जमिनीवर विनापरवाना साठवून ठेवलेला अंदाजे ४८ ब्रास रेतीचा साठा महसूल प्रशासनाने जप्त केला. जप्त केलेली रेती दंडात्मक कारवाईपुरती मर्यादित न ठेवता गावातील घरकुल लाभार्थ्यांना जागेवरच मोफत वितरित करण्यात आली.गावातील १२ घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी ४ ब्रास प्रमाणे एकूण ४८ ब्रास रेतीचे वाटप करण्यात आले. लाभार्थ्यांमध्ये द्वारकाबाई मारोती शिंदे, पार्वती नाथा घनवे, कावेरी भीमराव शिंदे, कलावती जयराम दवणे, पार्वती सदाशिव ढोरे, लीलावती आत्माराम दळवे, रुखमाबाई महादेव टाकसाळ, बंडू केशव शिंदे, गजानन संपत शिंदे, शारदाबाई मारुती शिंदे, कैलास सखाराम बोकन आणि दत्तराव सखाराम बोकन यांचा समावेश आहे.

या कारवाईत नायब तहसीलदार गजानन जवादे, मंडळ अधिकारी जी. एल. गरकळ, ग्राम महसूल अधिकारी डी. डी. सावळे तसेच दीपक गोटे, विनोद दुबे, एम. एम. कव्हर आणि जी. आर. खूपसे यांनी सहभाग घेतला.

तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या कार्यकाळात आतापर्यंत रिसोड तालुक्यात जप्त करण्यात आलेल्या १८४ ब्रास रेतीचा साठा ११२ घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आला आहे. अवैध गौण खनिज साठ्याविरुद्ध कठोर भूमिका आणि गरजूंना थेट मदत या दुहेरी उद्दिष्टांमुळे महसूल प्रशासनाची कारवाई कौतुकास्पद ठरत आहे.

अवैध गौण खनिज साठ्यावर कठोर कारवाई करतानाच जप्त केलेल्या रेतीचा सामाजिक उपयोग करून प्रशासनाने नागरिकाभिमुख शासनाचे उदाहरण घालून दिले आहे.


👉 वाचा संबंधित बातम्या


📢 तुमच्या भागातील बातमी आम्हाला पाठवा

स्थानिक समस्या, प्रशासनिक निर्णय किंवा सामाजिक उपक्रमाबाबत माहिती असल्यास Kattanews.in ला जरूर पाठवा.

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

अंढेरा पोलिसांनी पकडलेले अवैध रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर

अंढेरा पोलिसांची मोठी कारवाई! रेतीची अवैध वाहतूक करणारे २ टिप्पर पकडले; ८ ब्रास रेतीसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

चिखली-खामगाव मार्गावर बस आणि टिप्परची जोरदार धडक

चिखली-खामगाव मार्गावर भीषण अपघात! बस-टिप्परची जोरदार धडक; टिप्परचा चुराडा

चिखलीतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडे निवेदन देताना उपनगराध्यक्ष वैशालीताई खेडेकर

चिखलीत मुलींच्या छेडछाडीविरोधात उपनगराध्यक्षांचा पोलिसांना इशारा; “कारवाई करा, अन्यथा महिलांना घेऊन रस्त्यावर उतरू!”

MPSC पेपरफुटी प्रकरणात अवर सचिवासह 6 जणांना अटक

MPSC पेपरफुटीचा धक्कादायक भांडाफोड; अवर सचिवासह 6 जणांना अटक, प्रेमभंगातून फुटला पेपर

अंजनी खुर्द येथे ईद मिलाद निमित्त मदरशातील मुलांचा जुलूस

अंजनी खुर्दमध्ये ईद मिलादचा उत्साह; मदरशातील मुलांचा जुलूस अन् नात-कलिमाचे पठण

साखरखेर्डा येथे ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त रक्तदान करताना रक्तदाते

साखरखेर्डा येथे ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १४० जणांचे रक्तदान, हिंदू-मुस्लिम बांधवांनी जपली सामाजिक बांधिलकी

Leave a Comment