दिवाळी जाहिरात बुकिंग - KattaNews.in
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

मोजणी काम ठप्प! भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन; २ मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा

Follow Us:
महाराष्ट्रातील भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे आंदोलनामुळे जमीन मोजणी सेवा ठप्प

शेगाव | १७ फेब्रुवारी २०२६

महाराष्ट्रातील भूमी अभिलेख विभाग आंदोलन अंतिम टप्प्यात पोहोचले असून
जमीन मोजणी काम बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Maharashtra land survey strike मुळे नागरिकांच्या जमिनीच्या नोंदी,
मोजणी, नकाशे व मालमत्ता संबंधित कामांवर परिणाम होऊ शकतो.
भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्यच्या नेतृत्वाखाली
राज्यभर आंदोलनाची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीला जिल्ह्यातील सर्व भूमी अभिलेख कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक हे विभागाचे कणा मानले जातात.
जमिनीची मोजणी, सीमांकन, नकाशे तयार करणे आणि शासकीय नोंदी अद्ययावत ठेवणे
ही अत्यंत तांत्रिक स्वरूपाची जबाबदारी त्यांच्यावर असते.

भूकरमापक पदासाठी अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका आवश्यक असताना,
इतर विभागांमध्ये तांत्रिक वेतनश्रेणी लागू आहे; मात्र भूमी अभिलेख विभागात
अजूनही लिपिक वर्गीय वेतन दिले जाते. न्यायाधिकरणाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय
दिल्यानंतरही शासनाने तांत्रिक वेतन लागू न केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची रूपरेषा जाहीर केली असून १८ फेब्रुवारी २०२६ रोजी मोजणी साहित्य
कार्यालयात जमा करून काळ्या फिती लावून कामकाज करण्यात येणार आहे.
२० फेब्रुवारीपासून मोजणी काम बंद ठेवले जाईल, २३ ते २६ फेब्रुवारीदरम्यान
सामूहिक रजा घेण्यात येणार आहे, तर २७ फेब्रुवारी रोजी पुणे येथील जमाबंदी आयुक्त
कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

मागण्या मान्य न झाल्यास २ मार्चपासून राज्यभर बेमुदत संप पुकारण्यात येईल,
असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे जमीन मोजणी, सीमांकन,
मालमत्ता नोंदी, नकाशे अद्ययावत करणे तसेच शेती व बांधकाम संबंधित व्यवहारांवर
परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या बैठकीसाठी रमेश सरकटे, गजानन इंगळे, श्रीमती दीपाली मुरकुटे,
किशोर इंगळे, विजय चव्हाण, अभय पाटील, अनिल दांडगे तसेच
बुलढाणा जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


📢 नागरिकांसाठी सूचना : जमीन मोजणी, सीमांकन किंवा मालमत्ता नोंदींची कामे प्रलंबित असल्यास ती तातडीने पूर्ण करून घ्यावीत.


👉 हे पण वाचा :

• मागेल त्याला सोलारपंप योजनेचा बोजवारा! ऑनलाईन अर्जाच्या गोंधळात साखरखेर्ड्यात शेकडो शेतकऱ्यांचे लाखो रुपये अडकले
• खापरखेड रेती घाटावर नियमांना तिलांजली! पोकलॅंडच्या साह्याने अवैध उत्खनन; महसूल विभागाच्या भूमिकेवर संशय
• जमीन मोजणी प्रक्रिया – नागरिकांनी काय जाणून घ्यावे?


📲 अपडेट्ससाठी भेट द्या : Kattanews.in

 

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

चौथा गाव बुलढाणा येथे पाणीपुरवठ्याबाबत ग्रामस्थांची तक्रार

बुलढाणा तालुक्यातील चौथा गावात रात्री १० वाजता पाणीपुरवठा; पाण्याच्या अपव्ययाबाबत ग्रामस्थांची नाराजी

हर घर तिरंगा अभियानासाठी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी बुलढाणा जिल्हा सज्ज; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे मोठे आवाहन

साखरखेर्डा येथे सुसज्ज बसस्थानक उभारण्याची मागणी

७५ गावांच्या प्रवाशांचा प्रश्न कधी सुटणार? साखरखेर्ड्यात सुसज्ज बसस्थानकासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे साकडे

ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते अभिनेत्री व पत्रकार किरण वाघ यांना साई प्रेरणा गौरव पुरस्कार प्रदान करताना

शिर्डीत किरण वाघ यांचा दुहेरी गौरव! ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते ‘साई प्रेरणा गौरव पुरस्कार’

लोणार नगरपरिषदेत घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात निवेदन देताना डॉ. गोपालसिंह बछिरे व शिवसेना उ.बा.ठा. पदाधिकारी

घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात शिवसेना उ.बा.ठा. आक्रमक; 15 दिवसांत माहिती न दिल्यास लोणार नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा

उत्रादा ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांचा घेराव; अर्धवट रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

उत्रादा ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा; ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांचा घेराव, अर्धवट रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

Leave a comment