हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

रुग्ण सेवा करून परतताना काळाचा घाला! चिखलीजवळ भीषण अपघातात पत्रकार राजू सुरडकर ठार, तिघे जखमी

On: February 17, 2026 12:06 PM
Follow Us:
चिखलीजवळ असोला मेरा फाट्यादरम्यान भीषण कार अपघातात पत्रकार राजू सुरडकर ठार

चिखली |१७ फेब्रुवारी २०२६

चिखली जवळ असोला–मेरा फाट्यादरम्यान रविवारी (१५ फेब्रुवारी) सकाळी घडलेल्या भीषण कार अपघातात पत्रकार राजू सुरडकर यांचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे रुग्ण सेवा करून परत येत असताना स्विफ्ट डिझायर कार झाडावर आदळल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातामुळे चिखली परिसरात हळहळ व्यक्त होत असून सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार, एमएच-२३ एएस ६१०६ क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून सुरेश सुरडकर, राजू सुरडकर, विवेक येवले व सतीश ठेंग हे चौघेजण छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णाला सोडून चिखलीकडे परत येत होते.दरम्यान सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील असोला ते मेरा फाट्यादरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या झाडावर जोरात आदळली. या भीषण धडकेत चौघेही जण गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि एका क्रुझर वाहन चालकाच्या मदतीने जखमींना तातडीने चिखली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान राजू सुरडकर (रा. बेराळा) यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर सुरेश सुरडकर (रा. बेराळा), विवेक येवले (रा. हिवरा आश्रम) आणि सतीश ठेंग (रा. शेलगाव जहागीर) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मृतक राजू सुरडकर हे पत्रकार म्हणून कार्यरत होते. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील तज्ज्ञ डॉक्टरांना चिखली येथे सेवा देण्यासाठी ते पीआरओ म्हणून काम पाहत होते.

त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि पाच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनाने बेराळा गावासह परिसरात शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.


📢 हे पण वाचा..


📲 आमच्याशी जोडलेले रहा

स्थानिक बातम्यांचे अचूक आणि वेगवान अपडेट्स मिळवण्यासाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

हर घर तिरंगा अभियानासाठी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी बुलढाणा जिल्हा सज्ज; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे मोठे आवाहन

साखरखेर्डा येथे सुसज्ज बसस्थानक उभारण्याची मागणी

७५ गावांच्या प्रवाशांचा प्रश्न कधी सुटणार? साखरखेर्ड्यात सुसज्ज बसस्थानकासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे साकडे

ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते अभिनेत्री व पत्रकार किरण वाघ यांना साई प्रेरणा गौरव पुरस्कार प्रदान करताना

शिर्डीत किरण वाघ यांचा दुहेरी गौरव! ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते ‘साई प्रेरणा गौरव पुरस्कार’

लोणार नगरपरिषदेत घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात निवेदन देताना डॉ. गोपालसिंह बछिरे व शिवसेना उ.बा.ठा. पदाधिकारी

घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात शिवसेना उ.बा.ठा. आक्रमक; 15 दिवसांत माहिती न दिल्यास लोणार नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा

उत्रादा ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांचा घेराव; अर्धवट रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

उत्रादा ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा; ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांचा घेराव, अर्धवट रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

एअरबॅगमुळे 75 वर्षीय वकिलाचा जीव वाचला; मेहकर येथे आयशरच्या धडकेत कारचा चक्काचूर

मेहकरमधील ज्येष्ठ वकिलाच्या कारला भरधाव आयशरची समोरून धडक; भीषण अपघातात कारचा चक्काचूर

Leave a Comment