हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

चिखली-बुलढाणा रोडवर भीषण अपघात! परीक्षेला निघालेल्या 23 वर्षीय युवकाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

On: February 13, 2026 7:37 AM
Follow Us:
चिखली-बुलढाणा रोड अपघात हातणी जवळ ट्रकखाली चिरडून युवकाचा मृत्यू

चिखली|१३ फेब्रुवारी २०२६

चिखली बुलढाणा रोड अपघात पुन्हा एकदा समोर आला असून हातणी जवळ भरधाव ट्रकने टू व्हीलरला जोरदार धडक दिल्याने 23 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या चिखली बुलढाणा रोड अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परीक्षेला जात असताना ट्रकखाली चिरडल्याने तरुणाचा दुर्दैवी अंत झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, चिखली मार्गावरील हातणी जवळ भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने टू व्हीलरला धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की युवकाचे अक्षरशः दोन तुकडे झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव शंतनू नारायण अंभोरे (वय 23) असे असून तो एकलारा येथील रहिवासी असल्याचे समजते. तो परीक्षेसाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनास्थळी पीएसआय गाढे आपल्या पथकासह तातडीने दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा सामान्य रुग्णालय, चिखली येथे पाठवण्यात आला आहे. संबंधित ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास चिखली पोलीस स्टेशन करत आहे.

दरम्यान, चिखली-बुलढाणा रोडवरील वाढते अपघात नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. वाहतूक नियमांचे पालन, वेगमर्यादा नियंत्रण आणि रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


📌 Related News


👉 Kattanews.in वर ताज्या अपडेटसाठी जोडलेले रहा

आपल्या परिसरातील ब्रेकिंग न्यूज, अपघात, राजकीय आणि सामाजिक घडामोडी सर्वात आधी वाचण्यासाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या. ही बातमी शेअर करा आणि स्थानिक पत्रकारितेला पाठिंबा द्या.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

हनवतखेडमध्ये बकरी गिळणारा महाकाय अजगर मृतावस्थेत

बकरी गिळणारा महाकाय अजगर मृतावस्थेत; हनवतखेडच्या शिवारात खळबळ, दुसरा अजगर असल्याने शेतकऱ्यांत भीती

मलकापूर पांग्रा शाळेच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनी

मलकापूर पांग्रा शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत दमदार कामगिरी; मोहिनी मगर तालुक्यात द्वितीय

मेरा बुद्रुकचे शुभम डोंगरदिवे UPSC यशानंतर सनदी अधिकारी

मेरा बुद्रुकच्या सुपुत्राची UPSC मध्ये झेप; शुभम डोंगरदिवे यांची सनदी अधिकारी म्हणून गुजरातमध्ये नियुक्ती

चिखली दरेगाव मार्गावर मुक्कामी एसटी बस सुरू करण्याची मागणी

सायंकाळी बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; चिखली–दरेगाव मुक्कामी बस सुरू करण्याची मागणी

Buldhana News - चिखलीत अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चाचा इशारा

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात चिखलीत महामोर्चाचा इशारा; ८ सप्टेंबरला तहसील कार्यालयावर आंदोलन

लोणारमध्ये स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात निवेदन देताना नागरिक

स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा, अन्यथा जोडोमारो आंदोलन; लोणारमध्ये रि.सेनेचा इशारा

Leave a Comment