देऊळगाव राजा |१ फेब्रुवारी २०२६
भरधाव कारने दुचाकीस पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना २४ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास देऊळगाव राजा–जालना मार्गावरील अशोक ढाब्यासमोर घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात ३० जानेवारी रोजी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचवेळी त्यांच्या दुचाकीच्या पाठीमागून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर (एमएच २८ बीक्यू १९८१) या कारच्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत जोरदार धडक दिली.
या अपघातात प्रकाश पाटोळे हे रस्त्यावर कोसळले असून त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
या घटनेप्रकरणी फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (A) तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोरे करीत आहेत.
🔗 संबंधित बातम्या
- जन्मदात्या पित्यापाठोपाठ राजकीय बापाचं छत्र हरवलं; अजित दादांच्या निधनाने मी कायमचा पोरका झालो – अॅड. नाझेर काझी
- नगराध्यक्षा मापारी यांच्या पुढाकाराने लोणार सरोवरातील माँ कमळजा देवी मंदिराचा प्रश्न मार्गी लागणार
- ७६ व्या वर्षी न्यायासाठी अन्नत्याग! रस्त्यासाठी गुरुजींचे सिंदखेडराजा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू
👉 आम्हाला Follow करा.










