हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

येवतीत जिजाऊ सृष्टीत संत तुकाराम महाराज मूर्ती प्रतिष्ठापना, हजारो भाविकांसाठी महाप्रसाद

Follow Us:
येवती जिजाऊ सृष्टीतील संत तुकाराम महाराज मूर्ती प्रतिष्ठापना व महाप्रसाद
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

रिसोड|२९ जानेवारी २०२६

रिसोड तालुक्यातील येवती गावात ग्रामस्थांच्या पुढाकारातून साकारलेल्या जिजाऊ सृष्टी व संत तुकाराम धाम येथे संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची भव्य प्रतिष्ठापना करण्यात आली. या पावन सोहळ्यानिमित्त पंचक्रोशीतील हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

पूर्वी ओसाड पडलेला गावठाण परिसर आज तुकाराम धाम आणि जिजाऊ सृष्टीमुळे संस्कार, विचार आणि प्रेरणेचे केंद्र बनला आहे. लहान मुलांसाठी खेळणी, वृक्षलागवडीतून निसर्ग संवर्धन, सांस्कृतिक सभागृह, आकर्षक उद्यान आणि भविष्यात उभारण्यात येणारे अत्याधुनिक वाचनालय यामुळे हा परिसर रमणीय झाला आहे.

गत सात दिवस येथे सप्ताहाच्या निमित्ताने हरिपाठ, संकीर्तन, यज्ञ व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांना भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला. आज झालेल्या महाप्रसादाचा लाभ पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी घेतला.

येवती गावातील नागरिकांच्या ऐक्यामुळेच संत तुकाराम महाराज यांची मूर्ती प्रतिष्ठापना शक्य झाली असून हे गाव आज आदर्शवत ठरत आहे. या महान कार्यासाठी पहिल्या दिवसापासून अथक परिश्रम करणाऱ्या सर्व बांधवांचे व ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तुकाराम धाम येवती हे गावासाठी सदैव प्रेरणास्थान ठरो, संत तुकाराम महाराजांच्या विचारांची ज्योत अखंड तेवत राहो, आणि येवती गाव प्रगती, संस्कार व एकतेचे उत्तम उदाहरण ठरो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


🔔 वाचा Kattanews.in वर – आपल्या गावाच्या, समाजाच्या आणि संस्कारांच्या बातम्या सर्वात आधी!

📌 हे पण वाचा 

तऱ्हाळा येथे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी, युवकांचा मोठा सहभाग
रिसोडमधील संत ज्ञानेश्वर विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात; मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण
▪ ग्रामस्थांच्या एकतेतून साकारलेली जिजाऊ सृष्टी

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment