Weather Alert Maharashtra:हवामान विभागाचा इशारा ! राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. दिवाळी संपूनही ढगाळ वातावरण कायम आहे. आता हवामान विभागाने मोठा अलर्ट जारी केला असून पुढील 24 तास अतिवृष्टी आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता तीव्र होऊन “मोंथा” चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.
या चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक भागांत 55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
राज्यभर पावसाचं थैमान
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये कालपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी वीजांचा कडकडाट, वाऱ्याच्या जोरासह पाऊस आणि विजेचा लपंडाव पाहायला मिळाला.
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
भारतीय तटरक्षक दल आणि हवामान विभागाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन केलं आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे सक्रिय झाल्याने वारे 45 ते 55 किमी प्रतितास वेगाने वाहणार आहेत.
या वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असल्याने किनारपट्टी भागातील नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांना सूचनाः
पुढील 24 तास घराबाहेर पडणे टाळा.विद्युत खांब, झाडे आणि उघड्या जागेत थांबू नका.मोबाईल चार्ज ठेवून हवामान अपडेट पाहत राहा.आवश्यक वस्तू घरात सुरक्षित ठेवा.प्रशासनाच्या सूचना पाळा.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात पावसाची तीव्रता कायम राहील.नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हवामान हळूहळू कोरडे होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.










