बुलढाणा/भागवत गायकवाड:
सिंदखेडराजा तालुक्यातील वडाळी ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील वडाळी ग्रामपंचायत भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी वडाळी गावातील विद्या संदीप कापसे यांनी थेट बुलढाणा जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील वडाळी ग्रामपंचायत भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवल्यामुळे आपल्याला धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणात माहितीच्या अधिकारातून (RTI) कागदपत्रे समोर आल्यानंतर सिंदखेडराजा पंचायत समितीकडून चौकशी झाली. चौकशीत सरपंच व ग्रामसेवक जे.एस. नागरे यांनी सुमारे २ लाख ६४ हजार रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले. मात्र, इतके गंभीर निष्कर्ष समोर येऊनही ना रक्कम वसूल झाली, ना कोणताही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला.
“चौकशी झाली पण पुढे काय?” असा सवाल उपस्थित करत हे प्रकरण ‘मॅनेज’ करण्यात आल्याचा संशय विद्या कापसे यांनी व्यक्त केला. दोषींवर कारवाई होत नसल्यामुळेच आपण आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले.
उपोषणाची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (CEO) देण्यात आली असता, “बाई मेली तरी मला फरक पडत नाही” असे कथित उद्गार काढल्याचा गंभीर दावा विद्या कापसे यांनी केला आहे. या वक्तव्यामुळे प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हे पण वाचा..
बुलढाण्यात ACB ची मोठी कारवाई! वनविभागाची ACF अश्विनी आपेट लाच घेताना रंगेहात.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणाची अद्याप कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही. जोपर्यंत दोषी सरपंच, तत्कालीन ग्रामसेवक आणि संबंधित विस्तार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा विद्या कापसे यांनी दिला आहे.
📢 Kattanews.in | Call To Action
👉 ग्रामपंचायत भ्रष्टाचार, प्रशासनातील गैरप्रकार आणि जनतेच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आवाजांना पाठिंबा देण्यासाठी Kattanews.in ला फॉलो करा.
👉 अशीच धक्कादायक आणि विश्वासार्ह बातमी सर्वात आधी वाचण्यासाठी आमच्या वेबसाइटला नियमित भेट द्या.
📰 हे पण वाचा..













