प्रतिनिधी | जळगांव जामोद
जळगाव तालुक्यातील सुनगाव येथे घरात घुसून विवाहितेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
घर सुरक्षित नसल्याची भावना पुन्हा एकदा या विवाहितेवर अत्याचार प्रकरणामुळे निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता पीडित महिला घरी एकटी असताना आरोपी दारूच्या नशेत तिच्या घराजवळ आला.
घराच्या दरवाजाला लाथ मारून जबरदस्तीने आत प्रवेश करत त्याने तिचे तोंड दाबून विनयभंगाचा प्रयत्न केला.
पीडित महिलेने प्रतिकार केला असता आरोपीने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला.
घटनेची कुणालाही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देत आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
या विवाहितेवर अत्याचार घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
घटनेनंतर पीडित महिलेने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तिच्या जबाब व वैद्यकीय अहवालाच्या आधारे आरोपीविरुद्ध
कलम ६४(१), ७५(१), ३३३ व ३५१(३) बीएनएस अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
बीट अधिकारी पोउपनि नागेश खाडे करीत आहेत.
आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
👉 अधिक ताज्या गुन्हेगारी बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या
महिला सुरक्षा, क्राईम न्यूज, स्थानिक घडामोडी आणि ब्रेकिंग अपडेट्ससाठी
Kattanews.in वर दररोज भेट द्या.
Related News
- दिव्यांग दाम्पत्यावर कोसळले दुःख! आव्हा शिवारात शेतात करंट लागून ५२ वर्षीय महिला मजूराचा मृत्यू.
- Buldhana News : सहकार क्षेत्रात मोठी खळबळ! बुलडाण्यातील १३ पतसंस्थांचे परवाने रद्द होण्याच्या मार्गावर; सभासदांच्या ठेवींवर काय परिणाम होणार?
- लोणार सरोवरातील जलपातळी धोक्याच्या टप्प्यावर !कमळजा मातेच्या मुखवट्याला पाण्याचा स्पर्श.











