हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

धक्कादायक! नांगरटी करताना ट्रॅक्टर उलटला; २४ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

On: March 27, 2026 11:02 AM
Follow Us:
काकोडा येथे नांगरटी करताना ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

कट्टा न्यूज/प्रतिनिधी |२७ मार्च २०२६

ट्रॅक्टर अपघात, नांगरटी अपघात आणि युवकाचा मृत्यू या घटनांनी पुन्हा एकदा ग्रामीण भाग हादरला आहे. काकोडा येथे नांगरटी करताना ट्रॅक्टर उलटून २४ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या शेती अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश अर्जुन मानखैर हा २४ वर्षीय युवक चोंढी टाकळेश्वर शिवारातील गट नंबर २१ मध्ये एका शेतकऱ्याच्या शेतात ट्रॅक्टरद्वारे नांगरटीचे काम करत होता. दरम्यान ट्रॅक्टरचे वळण घेत असताना अचानक तोल सुटल्याने ट्रॅक्टर अवजारासह शेतातील ओसाड विहिरीत पलटी झाला.या भीषण ट्रॅक्टर अपघातात गणेश हा ट्रॅक्टरखाली दबला गेला. घटनेची माहिती मिळताच शेजारच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत युवकाला बाहेर काढले आणि तात्काळ उपचारासाठी शेगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

मात्र गंभीर दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. या प्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

गणेश हा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे काकोडा गावात शोककळा पसरली आहे.


👉 संबंधित बातम्या


📢 Call To Action (CTA)

👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

👉 ही बातमी शेअर करा आणि आपल्या मित्रांना माहिती द्या.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

निलगायीच्या धडकेत अपघात झालेले शिवाजी धोंडूजी तुपकर

गुंज गावात हळहळ: निलगायीच्या धडकेत झालेल्या अपघातात जखमी मजुराचा अखेर मृत्यू

बुलढाणा दुष्काळ नुकसान भरपाई मागणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर एकनाथ शिंदे यांची भेट

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ नुकसान भरपाई मिळणार? आमदार खेडेकरांच्या मागणीनंतर शिंदेंचं मोठं आश्वासन

रताळी येथील शेतकरी पुत्र आकाश बळीराम पाटील आत्महत्या

दुष्काळ जाहीर होण्याच्या काही तास आधीच रताळीत शेतकरी पुत्राची आत्महत्या; शेतीचे नुकसान अन् कर्जाचा ताण

महाराष्ट्रात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, मुख्यमंत्री फडणवीस

मोठी बातमी! महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना मिळणार ‘या’ सवलती

विदर्भातील शेतकरी-शेतमजुरांसाठी राहुल गांधींना सुबोध सावजींचे आमंत्रण

विदर्भातील शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी राहुल गांधींनी यावे; सुबोध सावजींची ‘किसान एवं खेत मजदूरों की आवाज’ कार्यक्रमाची मागणी

केंद्रीय मंत्र्यांच्या गावाला जाणारी मोडकळीस एसटी बस, तारांनी बांधलेला पत्रा

केंद्रीय मंत्र्यांच्या मूळ गावाला जाणारी एसटीच मोडकळीस; तारांनी बांधलेली, पत्र्याच्या ठिगळाची बस… म्हणावी की धोक्याची सफर ?

Leave a comment