धामणगाव बढे/प्रवीण गरुडे:
मोताळा तालुक्यातील थड येथे किराणा दुकानाच्या जागेच्या वादातून चौघांनी एकावर तुफान हाणामारी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत प्रल्हाद रामलाल धनवटे (वय ५३) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या मारहाणीत प्रल्हाद धनवटे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. धामणगाव बढे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून एका आरोपीचा शोध सुरु आहे. त्यांच्याविरुद्ध IJC कलम १०९, ११५ (२), ३५२, ३५१ (२)(३), ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डीवायएसपींची घटनास्थळी पाहणी
घटनेच्या गांभीर्यामुळे बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनी थड येथे भेट देवून ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी प्रभारी ठाणेदार बालाजी शेंगेपल्लू व पोलिस उपनिरीक्षक राहुल वरारकर उपस्थित होते.
📌 Related News
- बुलढाणा जिल्ह्यातील मोठी कारवाई: अवैध वाळू वाहतूक जप्त
- खामगावात चाललं काय? महिला संचालिकेचे अपहरण; काँग्रेसच्या दोन नेत्यांवर थेट आरोप!
- सावरगाव डुकरे हादरलं! कुटुंबाचा अंत: मुलाने आई-वडिलांचा कुऱ्हाडीने खून करून स्वतः फाशी घेतली.
📣 CTA
👉 तुमच्या भागातील ताज्या अपडेटसाठी KattaNews.in regularly visit करा!











