हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

सिंदखेडराजा पंचायत समितीतील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर; कर्मचारी कार्यालयाऐवजी बाहेरच अधिक दिसतात!

On: January 22, 2026 6:48 PM
Follow Us:
सिंदखेडराजा पंचायत समिती कार्यालयातील अनागोंदी कारभारामुळे नागरिक त्रस्त
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

बुलढाणा | २२ जानेवारी २०२६

सिंदखेडराजा  पंचायत समितीतील हा विषय सध्या चर्चेचा बनला असून सिंदखेडराजा पंचायत समितीतील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.कार्यालयात विविध कामांसाठी दूरदूरच्या गावांवरून येणारे नागरिक उपाशीपोटी ताटकळत उभे असतात,
मात्र संबंधित कर्मचारी कार्यालयात सापडत नसल्याची तक्रार सातत्याने ऐकू येत आहे.

 

प्रभारी गटविकास अधिकारी गेल्यानंतर सिंदखेडराजा पंचायत समितीला अजितकुमार बांगर यांच्या रूपाने कायमस्वरूपी गटविकास अधिकारी मिळाले आहेत. बीड येथून बदली होऊन आलेले बांगर हे तरुण व होतकरू अधिकारी म्हणून ओळखले जात असून त्यांनी निर्णयप्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

मात्र सिंदखेडराजा तालुक्याचा सखोल अभ्यास अद्याप पूर्ण न झाल्याने काही बाबतीत जुन्या अधिकाऱ्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र आहे.
हळूहळू सर्व माहिती त्यांना मिळेल, यात शंका नाही,पण तोपर्यंत पंचायत समिती कार्यालयातील कारभार सुधारण्याची गरज तीव्र आहे.

विशेषतः रोजगार हमी योजना कार्यालयामध्ये दररोज मोठी गर्दी पाहायला मिळते.तुती लागवड, रोजगार हमी विहिरी, विहीर दुरुस्ती, मस्टर तयार करणे अशी विविध कामे याच कार्यालयातून केली जातात.
परंतु याच कार्यालयातील कर्मचारी बहुतांश वेळा बाहेरच राहत असल्याने
नागरिकांच्या कामांना मोठा विलंब होत आहे.

चिरीमिरीच्या अपेक्षेने काही नागरिक कार्यालयात येतात,
अशी दबक्या आवाजात चर्चा असताना कर्मचारी बाहेरच थांबणे पसंत करतात,
अशीही बोलकी प्रतिक्रिया समोर येत आहे.यामुळे या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण कोणाचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रोजगार हमी कार्यालयात खांदेपालट करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.जुन्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विभागात जबाबदारी देऊन
नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यास कारभार सुरळीत होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे पण वाचा..

गोरेगाव ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी आमरण उपोषणाची सांगता; गटविकास अधिकाऱ्यांचे ठोस आश्वासन

देवाण-घेवाणीच्या चर्चांमुळे कार्यालयाबाहेरचे वातावरण अनेकांना सोयीचे वाटत असल्याचीही चर्चा आहे.
त्यामुळे गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर यांनी या संपूर्ण प्रकरणाकडे तत्काळ लक्ष देऊन ठोस कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.

नागरिकांचा सवाल

  • कार्यालयीन वेळेत कर्मचारी बाहेर का असतात?
  • रोजगार हमी कार्यालयावर कोणाचे नियंत्रण आहे?
  • कामांसाठी आलेल्या नागरिकांना वेळेवर सेवा का मिळत नाही?

👉 Kattanews.in वर आपला आवाज मांडण्यासाठी

आपल्या परिसरातील समस्या, अन्याय किंवा बातमी आम्हाला पाठवा.
Kattanews.in – ग्रामीण जनतेचा खरा आवाज.

Related News

 

सचिन खंदारे

सचिन खंदारे हे गेल्या १० वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय असून स्थानिक प्रशासन, ग्रामीण प्रश्न, सामाजिक घडामोडी आणि जनतेच्या मूलभूत समस्यांवरील विश्वासार्ह वार्तांकनासाठी ओळखले जातात. तथ्याधारित माहिती, संतुलित मांडणी आणि क्षेत्रीय अनुभवाच्या जोरावर त्यांनी वाचकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

मोहाडी शिवारात बिबट्याचा हल्ला, नीलगाई जखमी

मोहाडी शिवारात बिबट्याचा थरार! नीलगाईवर हल्ला; मादी बिबट्या व दोन पिल्लांचा वावर

Leave a Comment