सिंदखेडराजा/समाधान सरकटे
सिंदखेडराजा जिजाऊ जयंतीच्या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवासाठी अद्याप कोणतेही नियोजन, आढावा बैठक किंवा ठोस निर्णय झालेला नसल्याने जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
राज्य समन्वयक महेश भैय्या डोंगरे पाटील यांनी सांगितले की, जिजाऊंच्या जन्मभूमीवर दरवर्षी लाखो भक्त येतात. मात्र पिण्याचे पाणी, स्वच्छता, शौचालये, पार्किंग, सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेचा गंभीर अभाव आहे. ही बाब इतिहास व जनभावनांचा अपमान करणारी आहे.
मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे उत्खननात सापडलेली अकराव्या शतकातील भगवान विष्णू–लक्ष्मीची मूर्ती ही अस्मितेचा विषय असून, १२ जानेवारी रोजी जिजाऊ जयंतीच्या दिवशी ती दर्शनासाठी खुली करावी, अन्यथा मराठा क्रांती मोर्चा स्वतः ती खुली करेल, असा इशाराही देण्यात आला.
समृद्धी महामार्गावर राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब व बाल शिवबा यांचा पुतळा तात्काळ उभारावा, मातृतीर्थच्या विकासासाठी मंजूर निधीचा हिशोब जाहीर करावा, अशी ठोस मागणी करण्यात आली.
श्रीमान राजे लखुजीराव जाधव राजवाड्यातील CCTV यंत्रणा बंद असून ती तात्काळ दुरुस्त करावी. सुविधा न देता तिकीट वसुली होत असल्यास ती तात्काळ बंद करावी, अशीही मागणी करण्यात आली.
हे पण वाचा..
१२ जानेवारीपर्यंत शासनाने निर्णय घेतला नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
📢 संबंधित बातम्या
- लाडकी बहिणी योजनेचा गैरवापर उघड! बुलढाण्यात Ladki Bahin Yojana प्रकरणी सहा कर्मचाऱ्यांकडून 99 हजारांची वसुली
- दिव्यांग दाम्पत्यावर कोसळले दुःख! आव्हा शिवारात शेतात करंट लागून ५२ वर्षीय महिला मजूराचा मृत्यू
- lonar lake:लोणार सरोवरातील जलपातळी धोक्याच्या टप्प्यावर !कमळजा मातेच्या मुखवट्याला पाण्याचा स्पर्श
👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in वाचत रहा.










