सिंदखेडराजा तालुक्यातील ताडशिवनी गावात बेकायदेशीर रेती (वाळू) उत्खननाच्या संशयामुळे तहसील कार्यालयाने बिना नंबरची जेसीबी जप्त केली होती. पोलीस आणि तहसील पथकांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही मशीन तहसील आवारात सुरक्षितपणे ठेवली होती.परंतु गुरुवार, २० नोव्हेंबर रोजी दुपारी ताशी 11:30 वाजता दोन आरोपींनी संगनमत करून ही जप्त जेसीबी चोरी (Sindkhed Raja JCB Chori) करून नेल्याची घटना घडली. घटना लक्षात येताच तहसीलदार अजित दिवटे व पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप यांनी पाठलाग करून मेहकर रोडजवळ जिजामाता पेट्रोल पंपाजवळ जेसीबीसह चालकाला पकडले.फिर्यादी शिपाई अनंता विठोबा वाठोरे (वय 40) यांनी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. फिर्यादीनुसार आरोपी — समाधान नारायण मोरे व शुशिल प्रभाकर शिंदे (रा. ताडशिवनी) यांनी पूर्वनियोजितपणे हे कृत्य केले असे दाखलात नमूद आहे. तात्काळ गुन्हा नोंदवून (नोंद क्र. कायमी अप क्र. २३२/२५) तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन आणि महसूल विभागानेही या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे.