हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
बुलढाणा जिल्हा बँक प्रकरणात मला जेलमध्ये टाकचिखलीत पहिल्यांदाच चौरंगी लढत! कोण मारेल बाजरिसोडमध्ये पोलीस प्रशासनाची भव्य ‘वॉक फॉर युMaharashtra Election 2025 Date : राज्यात आचारसंहिता लागू, स्थानिशेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! १५ दिवसांत ११ हजार अंढेरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई! ट्रॉली व र

सिंदखेडराजा तहसील आवारातून जप्त जेसीबी पळवली! तहसीलदार दिवटे यांचा थरारक पाठलाग — 2 आरोपी अटक|Sindkhed Raja‌‌ JCB Chori

On: November 22, 2025 6:54 AM
Follow Us:
Sindkhed Raja‌‌ JCB Chori

Sindkhed Raja‌‌ JCB Chori : सिंदखेडराजा तहसील आवारातून जप्त जेसीबी पळवण्याची धाडसी घटना उघड झाली आहे. ही जप्त जेसीबी वाळू उत्खननाच्या संशयावरून ताब्यात घेतली होती. आरोपींनी संगनमत करून तहसील कार्यालयाच्या आवारात उभे ठेवलेल्या जप्त जेसीबी ला चोरी (Sindkhed Raja‌‌ JCB Chori) करून नेल्याची तक्रार शिपाई अनंता विठोबा वाठोरे यांनी दाखल केली.
घटनेनंतर तहसीलदार अजित दिवटे व पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप यांनी तात्काळ पाठलाग केला व मेहकर रोडजवळ जेसीबीसह आरोपी पकडला. या जप्त जेसीबी प्रकरणामुळे महसूल व प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील ताडशिवनी गावात बेकायदेशीर रेती (वाळू) उत्खननाच्या संशयामुळे तहसील कार्यालयाने बिना नंबरची जेसीबी जप्त केली होती. पोलीस आणि तहसील पथकांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही मशीन तहसील आवारात सुरक्षितपणे ठेवली होती.परंतु गुरुवार, २० नोव्हेंबर रोजी दुपारी ताशी 11:30 वाजता दोन आरोपींनी संगनमत करून ही जप्त जेसीबी चोरी (Sindkhed Raja‌‌ JCB Chori) करून नेल्याची घटना घडली. घटना लक्षात येताच तहसीलदार अजित दिवटे व पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप यांनी पाठलाग करून मेहकर रोडजवळ जिजामाता पेट्रोल पंपाजवळ जेसीबीसह चालकाला पकडले.फिर्यादी शिपाई अनंता विठोबा वाठोरे (वय 40) यांनी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. फिर्यादीनुसार आरोपी — समाधान नारायण मोरे व शुशिल प्रभाकर शिंदे (रा. ताडशिवनी) यांनी पूर्वनियोजितपणे हे कृत्य केले असे दाखलात नमूद आहे. तात्काळ गुन्हा नोंदवून (नोंद क्र. कायमी अप क्र. २३२/२५) तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन आणि महसूल विभागानेही या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मोताळ्यात दुचाकीचा भीषण अपघात; नगरसेविकेच्या मुलाचा मृत्यू आणि पादचारी गंभीर जखमी

मोताळ्यात दुचाकीचा भीषण अपघात; नगरसेविकेच्या मुलाचा जागीच मृत्यू व पादचारी गंभीर जखमी.

तांदुळवाडी येथे बँक मॅनेजरच्या घरातील मोठी घरफोडी – ६ लाखांचा ऐवज चोरी

साखरखेर्डा पोलिस स्टेशनच्या हद्दीत तांदुळवाडीत बँक मॅनेजरच्या घरात मोठी चोरी; ६ लाखांचा ऐवज रातोरात गायब.

दुसरबीड–सिंदखेड राजा भीषण अपघातात सैन्यातील जवानांच्या पत्नीचा ट्रकखाली मृत्यू

दुसरबीड–सिंदखेड राजा मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरून पडलेल्या सैन्यातील जवानांच्या पत्नीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू.

आमदार अमित झनक वाशिम जिल्ह्याच्या पाणीप्रश्नावर विधानसभेत आवाज उठवत आहेत

वाशिम जिल्ह्याच्या पाणीप्रश्नासाठी आमदार अमित झनक यांचा विधानसभेत ठाम आवाज.

देऊळगाव राजा अपघात घटनास्थळाचे चित्र – महिला मजूर ठार आणि पाच जखमी

कामाच्या शोधात आलेल्या कापूस वेचणाऱ्या महिला मजुरांवर काळाची झडप; देऊळगाव राजातील भीषण अपघातात 2 महिला ठार

रिसोड महावितरण कार्यालयासमोर अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

रिसोड महावितरण कार्यालयासमोर अतिक्रमण – वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

Leave a Comment

WhatsApp Join Group!