हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

नापिकी व कर्जबाजारीपणाचा बळी! 32 वर्षीय शेतकरी पुत्राची शेतात विष प्राशन करून आत्महत्या

On: January 29, 2026 9:09 AM
Follow Us:
नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकरी पुत्राची आत्महत्या
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

मेरा बु. | २९ जानेवारी २०२६

सततची नापिकी, वाढते कर्ज आणि पिकाच्या नुकसानीमुळे ३२ वर्षीय तरुण शेतकरी पुत्राने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना २८ जानेवारी रोजी अंढेरा पोस्टे अंतर्गत येणाऱ्या मनुबाई येथे घडली.

मनुबाई येथील शेतकरी शंकर बाजीराव वायाळ यांच्याकडे गट नंबर २६६ मध्ये दोन ते तीन एकर कोरडवाहू शेती आहे. शेतीसाठी त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा मेरा खुर्द येथून सुमारे ७० हजार रुपयांचे पिककर्ज घेतले होते.

यावर्षी शेतात सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. मात्र हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले. त्यामुळे बँकेच्या कर्जाची परतफेड करणे कुटुंबाला शक्य झाले नाही.

वडिलांवर वाढलेल्या कर्जामुळे आणि घरातील आर्थिक परिस्थितीमुळे शंकर वायाळ यांचा लहान मुलगा नितीन शंकर वायाळ (वय ३२) हा तीव्र नैराश्यात होता. अखेर त्याने शेतात विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली.

या घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार पोफळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मर्ग दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे मनुबाईसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

📢 महत्वाची विनंती:
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात. आपले मत आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

मोहाडी शिवारात बिबट्याचा हल्ला, नीलगाई जखमी

मोहाडी शिवारात बिबट्याचा थरार! नीलगाईवर हल्ला; मादी बिबट्या व दोन पिल्लांचा वावर

Leave a Comment