हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

वाशिम जिल्ह्यात मोठा संतापजनक प्रकार! मस्टरच्या पैशांसाठी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याला कृषी अधिकाऱ्याची मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Follow Us:
गोगरी वाशिम येथे मस्टरच्या पैशांसाठी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याला कृषी अधिकाऱ्याची मारहाण करतानाचा व्हायरल व्हिडीओ
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

वाशिम |१५ जानेवारी २०२६

फळबाग योजनेअंतर्गत मस्टरच्या पैशांसाठी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याला कृषी अधिकाऱ्याची मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार वाशिम जिल्ह्यातील गोगरी (ता. मंगरूळपीर) येथे उघडकीस आला आहे. शेतकरी मारहाण आणि कृषी अधिकारी मारहाण या गंभीर घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यामुळे जिल्हाभर संतापाची लाट उसळली आहे.

फळबाग योजनेतील मस्टर मंजूर असूनही अनुदानाचे पैसे वेळेवर न मिळाल्याने गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी काल जिल्हा कृषी कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने आज तालुका कृषी अधिकारी कांबळे हे गोगरी गावात दाखल झाले.मात्र, तक्रारदार शेतकऱ्याला न्याय देण्याऐवजी संबंधित कृषी अधिकाऱ्याने थेट शेतकरी ऋषिकेश पवार यांच्याशी वाद घालून त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार गावकऱ्यांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून व्हायरल व्हिडीओमुळे कृषी विभागाची मोठी नाचक्की झाली आहे.

फळबाग योजनेतील मस्टरचे पैसे न मिळाल्याने आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यावर शासकीय अधिकाऱ्याने हात उचलणे ही लोकशाही व्यवस्थेची थट्टा असल्याची तीव्र प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

या प्रकरणात संबंधित तालुका कृषी अधिकारी शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप होत असून, दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबन व कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, तसेच पीडित शेतकरी ऋषिकेश पवार यांना न्याय व संरक्षण द्यावे, अशी जोरदार मागणी शेतकरी संघटना व ग्रामस्थांकडून केली जात आहे.

हे पण वाचा..

मोठी बातमी! राज्यातील 12 जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजला; 5 फेब्रुवारीला मतदान, 7 फेब्रुवारीला निकाल

या घटनेमुळे कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

👉 तुमचं मत काय?

शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी का? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की कळवा.

Kattanews.in ला फॉलो करा – ग्रामीण, शेतकरी आणि प्रशासनाशी संबंधित ताज्या बातम्यांसाठी.

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Maharashtra government decision to sell kerosene at petrol pumps due to LPG gas shortage

गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा

Leave a Comment