बुलढाणा | १७ जानेवारी २०२६
त्रिदिवसीय गणेशजयंती महोत्सवाचे कार्यक्रम
दि. २० जानेवारी रोजी ह. भ. प. अशोक महाराज घायाळ यांच्या त्रिदिवसीय गणेश पुराण कथा प्रारंभ होईल. सकाळी साडेदहा वाजता डॉ. अमित आरसोडे (हृदयरोग तज्ज्ञ, चिखली), डॉ. उमेश गुंजकर (तेजस्वी हॉस्पिटल, साखरखेर्डा) यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
नारायणा नेत्रालय, मेहकर यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप होणार असून दुपारी पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे यांचे कायदा व सुव्यवस्था विषयावर व्याख्यान होईल. सायंकाळी संत दुनियादास बाबा भजनी मंडळाचा सांगीतिक कार्यक्रम रंगणार आहे.
‘समा माय’चे ऐतिहासिक किर्तन
दि. २१ जानेवारी रोजी सायंकाळी महाराष्ट्रातील पहिली तृतीयपंथी किर्तनकार पत्रकार समा महाराज दौंडकर उर्फ ‘समा माय’ (अहिल्यानगर) यांचे किर्तन होणार असून, हा क्षण सामाजिक समतेचा संदेश देणारा ठरणार आहे.
काल्याचे किर्तन व पोवाड्याने सांगता
दि. २२ जानेवारी रोजी सकाळी किर्तन केसरी भरत महाराज जाधव (ब्रम्हपुरी) यांचे काल्याचे किर्तन होईल. यानंतर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत महाराज वितरण होणार आहे. रात्री शिवशाहीर देवानंद वानखेडे (मेहकर) यांच्या पोवाड्याने महोत्सवाची सांगता होणार आहे.
हे पण वाचा..
मेडिकल अॅडमिशनच्या नावाखाली १३ लाखांची फसवणूक! आयुर्वेदिक संस्थेच्या डॉक्टरवर गुन्हा दाखल
अशी आहे सवडदच्या मंदिराची प्रेरणादायी परंपरा
एकेकाळी दारूचा अड्डा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी ग्रामस्थांनी एकत्र येत १२/१२/२०१२ रोजी गणरायाचे भव्य मंदिर उभारले. आज हे मंदिर परिसरातील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. सामाजिक परिवर्तनाचे हे उदाहरण सवडदच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहे.
👉 वाचकांसाठी आवाहन
धार्मिक, सामाजिक आणि ग्रामीण महाराष्ट्रातील अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या. बातमी आवडल्यास शेअर करायला विसरू नका.
📰 हे पण वाचा.













