KattaNews नवीन जाहिरात KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

साखरखेर्डाला मोठी भेट! अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर; ३५ वर्षांच्या मागणीला यश

Follow Us:
साखरखेर्डा येथे मंजूर झालेले अप्पर तहसीलदार कार्यालय – बुलढाणा जिल्हा प्रशासन निर्णय

साखरखेर्डा, बुलढाणा | १२ फेब्रुवारी २०२६

KattaNews जाहिरात 1

साखरखेर्डा अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर झाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तालुका मागणीच्या पार्श्वभूमीवर शासनाने नव्या ६९ अप्पर तहसीलदार कार्यालयांमध्ये साखरखेर्डाचा समावेश केला आहे. त्यामुळे महसूल विभागाशी संबंधित विविध कामे आता स्थानिक स्तरावर होणार असून सुमारे ६० किलोमीटर प्रवासाचा त्रास कमी होणार आहे.

KattaNews जाहिरात 2

६० किमी प्रवासाचा त्रास संपणार?

साखरखेर्डा ते सिंदखेडराजा हे अंतर सुमारे ६० किलोमीटर आहे. अपुऱ्या वाहतूक सुविधेमुळे नागरिकांना तहसील कार्यालयीन कामांसाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. शेतकरी, विद्यार्थी आणि ग्राहक सेवा केंद्र चालकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या. नव्या अप्पर तहसीलदार कार्यालयामुळे हा प्रशासकीय भार कमी होणार आहे.

KattaNews जाहिरात 3

भाजपा सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा व तालुक्यापासून दूर असलेल्या भागात अप्पर कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार साखरखेर्डा, शेंदुर्जन आणि मलकापूर पांग्रा या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.

KattaNews जाहिरात 4

आंदोलनाची फलश्रुती की पहिला टप्पा?

साखरखेर्डा तालुका निर्मितीसाठी तत्कालीन आमदार तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. अनेकांनी उपोषणही केले होते.

“आमची मागणी तालुका निर्मितीचीच होती. अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर होणे ही आंदोलनाची फलश्रुती आहे, परंतु आम्ही तालुका मागणी कायम ठेवणार आहोत.”

– रामभाऊ जाधव, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

लोकसंख्या आणि भौगोलिक गरज

साखरखेर्डा गावाची लोकसंख्या सुमारे २५ हजार असून २० किलोमीटर परिसरात ८५ गावे आहेत. नगर पंचायत आणि पूर्ण तहसील कार्यालय मंजूर करून स्वतंत्र तालुका घोषित करण्याची मागणी अद्याप कायम आहे.

“शासनाने विकासाचे एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. पुढील काळात तालुका निर्मितीची मागणीही पूर्ण होईल.”

– उल्हास देशपांडे, भाजपा प्रदेश सदस्य


Related News


📢 आपल्या भागातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या आणि Follow करा.

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

डोणगाव बसस्थानकाशेजारी राज्य महामार्गावर असलेले उघडे रोहीत्र

घटना घडण्याची वाट पाहतंय का महावितरण? डोणगाव बसस्थानकाजवळ उघड्या रोहीत्राचा गंभीर धोका

डोणगावमध्ये CMLT पात्रतेवर पॅथॉलॉजी लॅब सुरू असल्याचा आरोप

डोणगावमध्ये अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबचा सुळसुळाट? CMLT पात्रतेवर लॅब सुरू असल्याचा आरोप, आरोग्य विभागाच्या चौकशीची मागणी

इन्स्टाग्राम स्टोरीच्या वादातून मेहकरमध्ये पिता-पुत्राला मारहाण, वडिलांचा मृत्यू

एका इन्स्टा स्टोरीची किंमत जीव देऊन चुकवावी लागली! मेहकर तालुक्यात पिता-पुत्राला मारहाण; वडिलांचा मृत्यू, १५ आरोपी अटकेत, २० जणांविरुद्ध गुन्हा

देऊळगाव राजा येथील श्री बालाजी संस्थानमध्ये लक्ष्मीपूजन आणि सरस्वती पूजन धार्मिक वातावरणात संपन्न

देऊळगाव राजात श्री बालाजी संस्थानमध्ये लक्ष्मीपूजन आणि सरस्वती पूजन उत्साहात संपन्न; पाडव्याला पंचांग वाचनासह पारंपरिक विधी

पेनटाकळी धरणाच्या पाणीवाटपावरून प्रतापराव जाधव, श्वेता महाले, सिद्धार्थ खरात, संजय रायमुलकर आणि रविकांत तुपकर यांच्यातील राजकीय भूमिकांचे विश्लेषण

पाणी मिळाले, पण राजकीय पोळी भाजली कुणाची?पेनटाकळीच्या संघर्षाचा राजकीय पंचनामा!

धाड बसस्थानकात सोन्याचे दागिने चोरी प्रकरणाचा तपास करणारे धाड पोलीस

धाड बसस्थानकात महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने चोरी; एका तासात 4 महिला आरोपींचा शोध, 94 हजारांच्या चोरीचा उलगडा

Leave a comment