हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

ग्राहक फसवणुकीविरोधात ठोस भूमिका! पत्रकार सचिन खंडारे यांची विदर्भ अध्यक्षपदी निवड

On: January 21, 2026 8:51 AM
Follow Us:
Journalist Sachin Khandare appointed as Vidarbha President of Consumer Protection Committee
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

बुलढाणा |२१ जानेवारी २०२६

 ग्राहकांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या विदर्भ अध्यक्षपदी  पत्रकार सचिन खंडारे यांची निवड करण्यात आली आहे. सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात नावलौकिक असलेले सचिन खंडारे यांची ही नियुक्ती ग्राहक फसवणुकीविरोधातील लढ्यास बळ देणारी मानली जात आहे. ग्राहकांचे हक्क, न्याय आणि संरक्षण या मुद्द्यांवर विदर्भात अधिक प्रभावी काम केले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल व ग्राहक संरक्षण फाउंडेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीमार्फत ही निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब केदारे आणि राष्ट्रीय सचिव डॉ. अविनाश झोटिंग यांनी दिनांक 18 जानेवारी रोजी अधिकृत निवड पत्र देत ही जबाबदारी सोपवली.

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती संपूर्ण देशभरात कार्यरत असून ज्या ठिकाणी ग्राहकांची फसवणूक होते, त्या ठिकाणी पीडित ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी समिती सातत्याने प्रयत्न करते. पेट्रोल पंप, कृषी केंद्र, बँका, मोबाईल दुकाने, कापड दुकाने याठिकाणी होणाऱ्या फसवणुकीच्या तक्रारी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.

या संदर्भात बोलताना सचिन खंडारे यांनी सांगितले की, बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात ग्राहकांच्या तक्रारींवर तत्काळ दखल घेऊन त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी ठोस भूमिका घेतली जाईल. तसेच सक्षम, जागरूक आणि अधिकार जाणणारा ग्राहक कसा घडवता येईल, यासाठी जनजागृती उपक्रम राबवले जातील.

या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष शालिकराम चव्हाण, विदर्भ पदाधिकारी सुनील अंभोरे, डॉ. गंगाराम उबाळे आदींनी सचिन खंडारे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


📢 हे आवश्यक करा 

ग्राहक हक्क, सामाजिक प्रश्न आणि विदर्भातील ताज्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी Kattanews.in ला  Follow करा.


📰 Related News

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Maharashtra government decision to sell kerosene at petrol pumps due to LPG gas shortage

गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा

Leave a Comment