हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
देऊळगाव राजा : डीपी रोडवरील अतिक्रमणावरून वायुवा उद्योजक संजय शंकरराव चव्हाण जिल्हा परिषNagarpalika 2025: बुलढाणा जिल्ह्यात अभूतपूर्व नामांकन; १६ वर्षीय सोहम गायकवाडचा हृदयविकाराने मृत्यआजचे राशिभविष्य (Today Rashi Bhavishya in Marathi) | 1 नोव्हेंबर 2025 | दुसरबीड : शेतकरी रामकिसन शितोळे यांची गळफास घ

रिसोड नगर परिषद निवडणूक: भाजप-शिवसेना शिंदे गट युती ठरली; राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश अद्याप अनिश्चित.

On: November 15, 2025 9:57 PM
Follow Us:

रिसोड/नारायणराव पाटील

रिसोड नगर परिषद निवडणुकीसाठी अखेर भाजप व शिवसेना शिंदे गटाची युती निश्चित झाली आहे. भाजप नेते माजी खासदार अनंतराव देशमुख आणि शिवसेना विधान परिषद आमदार भावनाताई गवळी आता संयुक्तरित्या ही निवडणूक लढणार आहेत. भाजप-शिवसेना युतीमुळे आता नगर परिषद निवडणुकीत प्रचार-प्रसारात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र दिसून येतील.

राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश अद्याप अस्पष्ट

नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगवानदादा क्षीरसागर आणि त्यांचे सुपुत्र किरण क्षीरसागर भाजपमध्ये प्रवेश झाले आहेत, परंतु रिसोड येथील महायुतीत त्यांचा समावेश अद्याप स्पष्ट नाही. भारतीय जनता पार्टीने भगवानदादा क्षीरसागर यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

जागा वाटप आणि युतीचा आराखडा

23 नगरसेवक जागांपैकी, शिवसेना शिंदे गट 7 जागा लढवणार असून भारतीय जनता पार्टी 16 जागा आणि नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार लढवणार आहे. युतीबाबत अधिकृत घोषणा लवकरच प्रभाग निहाय केली जाणार आहे. रिसोड शहरातील प्रभाग 2 मध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे, असेही माहिती मिळाली आहे.

युतीसाठी नेत्यांचे प्रयत्न

भाजप व शिवसेना युती व्हावी आणि नगर परिषद निवडणूक एकत्र लढावी यासाठी गजानन पाचारणे, महादेव ठाकरे, मच्छिंद्र ढोणे यांनी अनेक दिवस प्रयत्न केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला जागा न मिळाल्यामुळे, आता त्यांचा पुढील धोरणात्मक निर्णय काय असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

पूर्ण बातमी वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!