हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

रिसोड क्रीडा संकुलात उघड भ्रष्टाचार? काम थांबवा, देयके गोठवा – किशोर काळेंची तहसीलदारांकडे थेट तक्रार

On: December 30, 2025 8:06 AM
Follow Us:
रिसोड क्रीडा संकुल भ्रष्टाचार प्रकरणी तहसीलदारांकडे तक्रार देताना किशोर काळे
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरु पाटील 

रिसोड क्रीडा संकुल भ्रष्टाचार प्रकरणात मोठा आरोप समोर आला असून रिसोड क्रीडा संकुल भ्रष्टाचार संदर्भात थेट तहसीलदारांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. रिसोड क्रीडा संकुल भ्रष्टाचार प्रकरणात चालू काम तात्काळ थांबवून सर्व देयके गोठवावीत, अशी ठाम मागणी तरुण सामाजिक कार्यकर्ते किशोर काळे यांनी केली आहे. रिसोड क्रीडा संकुल भ्रष्टाचार हा विषय आता संपूर्ण तालुक्यात चर्चेचा ठरला आहे.

दि. 29 डिसेंबर 2025 रोजी किशोर काळे यांनी रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना दिलेल्या निवेदनात, रिसोड तालुक्यात सुरू असलेल्या क्रीडा संकुलाच्या बांधकामात उघडपणे शासन निधीचा गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणात प्रशासकीय संगनमत, निकृष्ट दर्जाचे बांधकाम व नियमबाह्य पद्धतीने काम सुरू असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

निवेदनानुसार, सदर क्रीडा संकुलाच्या बांधकामात शासनमान्य आराखडे, तांत्रिक अटी व गुणवत्ता मापदंडांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करण्यात येत आहे. निकृष्ट साहित्याचा वापर करून वाढीव मोजमापे दाखवून बिले काढण्याचा प्रकार सुरू असून, हे सर्व संबंधित अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताशिवाय शक्य नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, अधिकृत ठेकेदाराने प्रत्यक्ष काम न करता हे काम बेकायदेशीररित्या दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेतल्याचेही निदर्शनास आले आहे. प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तीकडे वैध GST नोंदणी नसताना सरकारी काम करून घेतले जात असल्याने हा प्रकार करचुकवेगिरी, आर्थिक फसवणूक व कंत्राट अटींचा गंभीर भंग ठरतो.

या सर्व बाबींवर यापूर्वीही वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, हा निष्काळजीपणा नसून भ्रष्टाचाराला अप्रत्यक्ष संरक्षण देण्याचा प्रकार असल्याचे किशोर काळे यांनी नमूद केले आहे.

हे क्रीडा संकुल रिसोड तालुक्यातील खेळाडू व विद्यार्थ्यांसाठी उभारले जात असून, अशा दर्जाहीन व नियमबाह्य बांधकामामुळे भविष्यात जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चालू असलेले सर्व काम तात्काळ थांबवून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांची देयके गोठवावीत, तसेच स्वतंत्र व निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी सुरू करावी, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.

जर 15 दिवसांत ठोस कारवाई झाली नाही, तर 25 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे शांततेत आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. या प्रकरणाच्या निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम उपविभाग रिसोड व तालुका क्रीडा अधिकारी रिसोड यांना देण्यात आल्या आहेत.

📢 हे आवश्य करा..

➡️ अशाच महत्त्वाच्या व निर्भीड बातम्यांसाठी Kattanews.in नियमित वाचा
➡️ ही बातमी शेअर करून भ्रष्टाचाराविरोधातील लढ्यात सहभागी व्हा

🔗 हे पण वाचा..

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment