KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

पूर्णा नदीत अवैध वाळू वाहतुकीवर प्रशासनाचा घाव; ८ टिप्पर जप्त, १.६२ कोटींचा मुद्देमाल ताब्यात

On: December 30, 2025 7:36 AM
Follow Us:
पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करताना जप्त करण्यात आलेले टिप्पर – बुलढाणा

बुलढाणा प्रतिनिधी/भागवत गायकवाड 

बुलढाणा जिल्ह्यात पूर्णा नदी अवैध वाळू वाहतूक प्रकरणाने पुन्हा एकदा प्रशासनाला सतर्क केले आहे.

पूर्णा नदी अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूल व पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करत
मोठा धक्का दिला आहे. मलकापूर तालुक्यातील नरवेल परिसरात
पूर्णा नदी अवैध वाळू वाहतूक करत असलेले ८ टिप्पर रंगेहाथ पकडण्यात आले.
या कारवाईत पूर्णा नदी अवैध वाळू वाहतूक प्रकरणातील सुमारे १ कोटी ६२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली.
दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी एमआयडीसी मलकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील नरवेल कोटेश्वर मंदिर शिवारात
पेट्रोलिंगदरम्यान जमुनापुरी घाटातून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती.

माहितीच्या आधारे नाकाबंदी करण्यात आली असता संशयास्पद ८ टिप्पर वाहने थांबवण्यात आली.
तपासणीदरम्यान चालकांकडे वाळू वाहतुकीसाठी कोणतीही वैध परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले.
पंचासमक्ष तपासणीमध्ये प्रत्येकी सुमारे २ ब्रॉस वाळूप्रमाणे एकूण १६ ब्रॉस वाळू (अंदाजे किंमत २ लाख रुपये)
आणि प्रत्येकी सुमारे २० लाख रुपये किमतीची ८ टिप्पर वाहने जप्त करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस स्टेशन एमआयडीसी मलकापूर येथे गुन्हा अप. क्र. १७५/२०२५ अन्वये
भा.न्या.सं. कलम ३०३(२) तसेच गौण खनिज अधिनियम २१(१), २१(२) अंतर्गत
८ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये मलकापूर, नांदुरा व मोताळा येथील व्यक्तींचा समावेश आहे.

जप्त टिप्पर वाहनांचे क्रमांक MH-28-BB-6174, 2895, 4414, 4172, 1210, 8910, 7935 व 7397 असे आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असून, अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात
यापुढेही कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

👉 अशीच ताज्या व विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in फॉलो करा.

Kattanews.in – बुलढाण्याची खरी बातमी

हे पण वाचा…

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजा पोलीस आणि तेलंगणा LCB प्रकरण

मामाच्या तक्रारीवरून अपहरणाची नोंद करण्याची देऊळगाव राजा पोलिसांना घाई का? तेलंगणा LCB प्रकरणात सवाल

जुने मंडपगाव शिवारात अवैध रेती वाहतुकीप्रकरणी जप्त केलेले नऊ टिप्पर

देऊळगाव राजा तालुक्यात अवैध रेती वाहतुकीवर महसूल-पोलिसांची धडक कारवाई; एकाच वेळी ९ टिप्पर जप्त

इंस्टाग्रामवर प्रेम जुळल्याने साखरखेर्डा येथील संसार मोडल्याची घटना

इंस्टाग्रामवर प्रेम जुळले, १२ वर्षांचा संसार मोडला! चार वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन महिला ३० वर्षीय युवकासोबत निघून गेली

नेवासा सोयाबीन चोरी प्रकरणात देऊळगाव राजा येथील तिघांना अटक

नेवासा सोयाबीन चोरीचा तपास थेट देऊळगाव राजात; पाच जणांची नावे समोर, तिघांना अटक, दोघे फरार

देऊळगाव राजा येथे तेलंगणा पोलिसांनी सराफ व्यावसायिकाला ताब्यात घेतल्याची घटना

देऊळगाव राजात तहसील कार्यालयातून सराफाला नेले; अपहरणाची चर्चा, नाकाबंदीत तेलंगणा पोलिसांचा मोठा खुलासा!

अमोना येथील ऋतिक पेहरे यांच्या मृत्यूची बातमी

चिखली तालुक्यातील अमोना येथे शेतकरी पुत्राची आत्महत्या; २५ वर्षीय ऋतिकच्या मृत्यूने गाव हळहळले

Leave a comment