हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

रिसोड हादरले! इंदिरा नगरमधील देशी दारूचे दुकान महिलांसाठी धोकादायक; नागरिकांचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

On: January 12, 2026 8:01 AM
Follow Us:
रिसोड इंदिरा नगर लोणी रोड देशी दारू दुकान विरोध नागरिक आंदोलन
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

रिसोड | दिनांक : 12 जानेवारी 2026

Risod Desi Daru Dukan Virodh प्रकरणामुळे संपूर्ण रिसोड शहर हादरले आहे. रिसोड शहरातील इंदिरा नगर, लोणी रोडवरील देशी दारूचे दुकान महिलांसाठी धोकादायक ठरत असून, या दुकानामुळे परिसरातील महिला, मुली व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नागरिकांनी जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे लेखी निवेदन देत हे देशी दारूचे दुकान तात्काळ हटविण्याची जोरदार मागणी केली आहे.
इंदिरा नगर परिसरातील रहिवासी सदानंद रामभाऊ चोपडे, सुनील सीताराम गवई, डॉ. अशोक इंगोले, शेख मुजाहिद शेख मुन्नाफ, सर्वजीत महादेव शेलके यांच्यासह अनेक नागरिकांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या देशी दारूच्या दुकानामुळे परिसरातील सामाजिक वातावरण पूर्णतः बिघडले आहे. मद्यधुंद व्यक्तींकडून रस्त्यावर गोंधळ, शिवीगाळ, भांडणे व गैरवर्तनाच्या घटना सातत्याने घडत असून, याचा थेट त्रास महिला, शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे.विशेष म्हणजे, या लोणी रोड मार्गावरूनच शाळा, इंगोले हॉस्पिटल, मेडिकल दुकाने व वसतिगृहे असून, महिलांना व विद्यार्थ्यांना दररोज याच रस्त्यावरून ये-जा करावी लागते. दारूच्या दुकानासमोर मद्यधुंद व्यक्ती उभ्या राहून महिलांकडे पाहणे, अश्लील बोलणे व रस्त्यावर अडथळा निर्माण करणे, अशा गंभीर तक्रारी निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.

या परिस्थितीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, तरुण पिढी व्यसनाधीन होण्याचा धोका वाढत असल्याचा गंभीर इशाराही नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.

नागरिकांनी प्रशासनाला स्पष्टपणे कळविले आहे की, जर ३० दिवसांच्या आत देशी दारूचे दुकान हटविण्यात आले नाही, तर नागरिक आंदोलन व आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारतील, आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील.

हे पण वाचा..

निजामपूरचे नाव बदलणार? श्रीरामपूर नामांतराचा प्रस्ताव तहसीलदारांकडे, जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे संकेत.

या निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक वाशिम, राज्य उत्पादन शुल्क विभाग, तहसीलदार रिसोड, पोलीस निरीक्षक रिसोड, नगर परिषद रिसोड तसेच लोकप्रतिनिधींना देण्यात आल्या असून, संबंधित विभागांचे शिक्के व स्वाक्षऱ्या झाल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

या संवेदनशील प्रकरणावर प्रशासन कोणती ठोस भूमिका घेते, याकडे आता संपूर्ण रिसोड शहराचे लक्ष लागले आहे.


🔗 संबंधित बातम्या

📢 तुमच्या भागातील बातमी पाठवा

तुमच्या परिसरातील समस्या, अन्याय किंवा आंदोलनाची माहिती Kattanews.in ला पाठवा.
तुमची बातमी आम्ही आवाज बनवू.

 

विजय जुंजारे

विजय जुंजारे हे रिसोड प्रतिनिधी असून वाशिम जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक घडामोडींचे कव्हरेज करतात.त्यांना २ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यक्रमांवर लक्ष ठेवतात. त्यांच्या बातम्या वाचकांना विश्वासार्ह आणि नेमकी माहिती देतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Maharashtra government decision to sell kerosene at petrol pumps due to LPG gas shortage

गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा

Leave a Comment