KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

निजामपूरचे नाव बदलणार? श्रीरामपूर नामांतराचा प्रस्ताव तहसीलदारांकडे, जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे संकेत

Follow Us:
निजामपूरचे नाव बदलून श्रीरामपूर करण्यासाठी रिसोड तहसीलदारांकडे सादर केलेला प्रस्ताव

रिसोड, वाशिम | 11 जानेवारी 2026 

निजामपूर नामांतर श्रीरामपूर या विषयावर वाशिम जिल्ह्यात महत्त्वाची घडामोड घडली असून रिसोड तालुक्यातील मौजे निजामपूर गावाचे नाव बदलून श्रीरामपूर करण्यात यावे, यासाठी अधिकृत प्रस्ताव तहसील कार्यालयात सादर करण्यात आला आहे. सदर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे सकारात्मक संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

रिसोड लगत असलेले मौजे निजामपूर ग्रामपंचायत अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. मोगलाई निजाम काळात या गावाला निजामपूर असे नाव देण्यात आले होते. मात्र स्वातंत्र्यानंतरही हे नाव कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी असून लोकशाही भारतात त्या कालखंडाची ओळख असलेले नाव बदलावे, अशी मागणी सातत्याने होत आहे.

ग्रामस्थांच्या मागणीनुसार लखनसिंह ठाकूर यांनी निवेदनाद्वारे रिसोड तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी सौ. प्रतीक्षा तेजनकर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. ग्रामपंचायत निजामपूरने देखील यासंदर्भात अधिकृत ठराव पारित केला असून निजामपूर ऐवजी श्रीरामपूर हे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

निजामपूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव तहसील कार्यालयात दाखल करण्यात आला आहे. सदर प्रस्ताव तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी वाशिम तसेच उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तात्काळ पाठवण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार सौ. प्रतीक्षा तेजनकर यांनी लखनसिंह ठाकूर यांना दिले आहे.

गावाच्या नामांतराबाबत लवकर निर्णय व्हावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली असून प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने निजामपूर ते श्रीरामपूर नामांतर प्रक्रिया अंतिम टप्प्यात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

👉 अशाच वाशिम जिल्ह्यातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजा येथे निकृष्ट रेशन तांदळाच्या निषेधार्थ संतोष भुतेकर यांनी तहसील कार्यालयात तांदूळ भेट दिला

देऊळगाव राजात निकृष्ट रेशन तांदळाचा अनोखा निषेध; पुरवठा अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून दिला तांदूळ!

बुलढाणा न्यायालयाने चिखलीतील बालिका अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास सुनावला

बुलढाणा न्यायालयाचा मोठा निर्णय! चिखलीतील ८ वर्षीय बालिकेवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास

आडगाव राजा पाणीपुरवठ्यासाठी पंचायत समिती कार्यालयात ठिय्या देताना ग्रामस्थ

पाणीपुरवठ्यासाठी आडगाव राजा ग्रामस्थांचा सिंदखेडराजा पंचायत समितीत ठिय्या! आठ दिवसांत नळाला पाणी देण्याचे लेखी आश्वासन

सुलतानपूर येथे मंडळ अधिकाऱ्याच्या कारमधून रोकड आणि शासकीय लॅपटॉपची बॅग चोरी

सुलतानपुरात वाहतूक कोंडीत संधी साधली! मंडळ अधिकाऱ्याच्या कारमधून ५० हजारांची रोकड, शासकीय लॅपटॉप चोरीला

सणासुदीत घरफोडी टाळण्यासाठी धाड पोलिसांनी नागरिकांना दिलेल्या सुरक्षा सूचना

सणासुदीत घर बंद करून बाहेर जाताय? धाड पोलिसांनी दिल्या महत्त्वाच्या सुरक्षा सूचना

रताळी येथे शेतकरी कुटुंबांशी चर्चा करताना आमदार रोहित पवार

रात्री ११ वाजता शेतकरी कुटुंबांचे अश्रू पुसण्यासाठी पोहोचले रोहित पवार; मदतीत अडवणूक झाल्यास थेट फोन करण्याचे आवाहन

Leave a comment