हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

रिसोड तालुक्यातील चिखलीत चोरांचा धुमाकूळ! एकाच रात्री 5 घरांवर घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास

On: January 26, 2026 11:45 AM
Follow Us:
Chikhali village Risod house burglary news Washim Maharashtra
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

रिसोड,वाशिम |२६  जानेवारी २०२६

रिसोड तालुक्यातील चिखली गावात घरफोडी ही गंभीर घटना समोर आली असून,अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री चार ते पाच घरांवर धाडसी घरफोडी करत लाखोंच्या ऐवजासह सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.
या घटनेमुळे संपूर्ण चिखली गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्राप्त माहितीनुसार, भिकाजी पुंड, कैलास घाटोळ, भगवान घाटोळ, पंडित घाटोळ,रवी अंभोरे तसेच ज्ञानेश्वर लाड यांच्या घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले.
या घरांमधून रोख रक्कम व मौल्यवान सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत.

ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याचा अंदाज असून,सकाळी शेजाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर घरमालकांना फोनद्वारे माहिती देण्यात आली.त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी रिसोड पोलीस स्टेशनकडे धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेबाबत रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी सांगितले की,
“रात्री सुमारे १२.३० वाजता ११२ क्रमांकाची पोलीस गाडी गावात पोहोचली होती.
गावकऱ्यांनी चोरांना पाहिल्याचे सांगितले, मात्र तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली नाही.
ही बाब गंभीर असून नागरिकांनी अधिक जागृत राहणे गरजेचे आहे.”

ठाणेदार चव्हाण यांनी पुढे स्पष्ट केले की,
कोणत्याही चोरीच्या घटनेची माहिती विलंब न करता पोलिसांना दिल्यास
तपास अधिक प्रभावीपणे करता येतो.

सलग अनेक घरांवर एकाच रात्री झालेल्या घरफोडीमुळे
चिखली गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोरट्यांचा तातडीने छडा लावावा तसेच
रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

या प्रकरणाच्या तपासासाठी रिसोड पोलीस स्टेशनच्या वतीने
कुत्र्याचा वापर करण्यात आला असून,
ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
यावेळी पोलीस ताफ्यासह चिखलीचे पोलीस पाटील मंगेश सरनाईक उपस्थित होते.


📌 नागरिकांसाठी आवाहन

आपल्या परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्यास
तात्काळ 112 किंवा नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा,
असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


Related News


📢 अधिक स्थानिक, राजकीय व गुन्हेगारी बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

मोहाडी शिवारात बिबट्याचा हल्ला, नीलगाई जखमी

मोहाडी शिवारात बिबट्याचा थरार! नीलगाईवर हल्ला; मादी बिबट्या व दोन पिल्लांचा वावर

Leave a Comment