हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मुंबईत रेल्वे पोलिस भरती चाचणीनंतर युवकाचा मृत्यू; बावनबीरमध्ये शोककळा

On: February 27, 2026 8:42 AM
Follow Us:
Railway Police recruitment ground test in Mumbai

मुंबई |२७ फेब्रुवारी २०२६

Railway Police Bharti Mumbai भरती प्रक्रियेसाठी गेलेल्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील railway police recruitment ground test पूर्ण केल्यानंतर बावनबीर येथील युवकाला अचानक प्रकृती बिघडून मृत्यू झाला. सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेलेल्या या उमेदवाराच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून (police bharti news) Maharashtra मध्ये ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.

अर्जुन उर्फ अक्षय तुळशीराम मसाळ (वय ३०, रा. बावनबीर) हा राज्य रेल्वे पोलिस दलाच्या भरती प्रक्रियेसाठी मुंबईत गेला होता. २३ फेब्रुवारी रोजी घाटकोपर येथील लोहमार्ग पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी सुमारे ११ वाजता त्याने मैदानी चाचणी दिली. चाचणी पूर्ण केल्यानंतर तो मित्रांसोबत बाहेर पडला. काही अंतर चालल्यानंतर थकल्यासारखे वाटल्याने त्याने जवळील साई मंदिरात थोडा आराम करण्याचा निर्णय घेतला.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

विश्रांती घेत असताना अचानक त्याला फिट आली आणि तो बेशुद्ध पडला. मित्रांनी तत्काळ त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद पंतनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शारीरिक चाचणीदरम्यान त्याने १०० मीटर ते १,६०० मीटरपर्यंत धाव घेतली होती आणि सकाळी ११:३८ वाजता तो भरती परिसरातून बाहेर पडला.

त्यानंतर साईबाबा मंदिरात विश्रांती घेत असताना त्याला भोवळ येऊन तो कोसळला. मुंबईत शवविच्छेदनानंतर २५ फेब्रुवारी रोजी बावनबीर येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण व मोठा आप्तपरिवार आहे. त्याच्या अचानक निधनाने गावात शोककळा पसरली असून नागरिकांकडून भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या आरोग्य सुरक्षिततेबाबत अधिक दक्षता घेण्याची मागणी होत आहे.


👉 संबंधित बातम्या


📲 ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.

👉 ही बातमी शेअर करा — माहितीच सुरक्षिततेचे पहिले पाऊल आहे.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

chikhli-couple-knife-attack-buldhana-kattanews.webp

अंगणातील क्षुल्लक वाद जीवावर बेतला; चिखलीत दाम्पत्यावर चाकूने जीवघेणा हल्ला

SIR Form 2026 Maharashtra voter list update process

SIR फॉर्म घरबसल्या 5 मिनिटांत कसा भरायचा? BLO घरी येणार, Part Number शोधण्यापासून स्वाक्षरीपर्यंत संपूर्ण माहिती

साखरखेर्डा ग्रामसभेत क्रीडांगणासाठी सरकारी जमीन राखीव ठेवण्याचा एकमुखी ठराव मंजूर

साखरखेर्डा मधील क्रीडांगणावर अखेर शिक्कामोर्तब! ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर; युवकांनी फटाके फोडून केला जल्लोष

₹25 हजारांची लाच घेताना पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप मोरे ACB च्या जाळ्यात

₹25 हजारांची लाच घेताना पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप मोरे ACB च्या जाळ्यात; विकासकामांच्या बिलासाठी मागितले होते 3% कमिशन

महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी; शासनाचे नवे परिपत्रक

मोठी घोषणा! महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी; शासनाने काढले नवे परिपत्रक

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचे पोलीस शिपाई चंद्रनिलकांत सोनुने यांनी मुंबईतील 80 वर्षीय महिलेला मदत केल्यानंतर त्यांचा गौरव करण्यात आला.

मुंबईत 80 वर्षीय आजीला दिला आधार; चिखलीच्या पोलीस शिपाई चंद्रनिलकांत सोनुने यांच्या माणुसकीची सर्वत्र चर्चा

Leave a Comment