हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

चिखला प्रकरण तापले! संभाजी व जिजाऊ ब्रिगेडची धडक एन्ट्री; पीडितांना न्याय देण्याची जोरदार मागणी

Follow Us:
चिखला काकड येथे संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड पीडितांची भेट घेताना

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी| २५ फेब्रुवारी २०२६

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे शिवजयंतीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वादातून महिलांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी चिखला गावाला भेट देत पीडित कुटुंबीयांची भेट घेत त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

या वेळी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड पीडितांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. महिलांवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

भेटीदरम्यान जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष अँड. उर्मिलाताई हाडे, प्रा. बोचे मॅडम, मंगलाताई कुटे, सुनिता देशमुख, वैशाली शिंदे, दुर्गा चव्हाण, गोदावरी तुपकर यांच्यासह संभाजी ब्रिगेड कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजकुमार जाधव, सेवा संघाचे अशोक मामा तुपकर, इंजि. दिनकर शिंदे, अँड. विनोद डव्हळे, विश्वनाथ बाहेकर, गजाननराव, संभाजी ब्रिगेडचे मदन दहातोंडे, संजय अंभोरे, राजूभाऊ अंभोरे, माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर वायाळ आदी उपस्थित होते.

चिखला घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण असून नागरिकांकडून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे.


📢 तुमच्या भागातील ताज्या बातम्यांसाठी

👉 स्थानिक बातम्या, ब्रेकिंग अपडेट्स आणि ग्रामीण प्रश्नांवरील विशेष वृत्तांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.


🔎 Related News

  • चिखला काकड प्रकरणामुळे जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण
  • शिवाजी महाराज पुतळा वादावरून महाराष्ट्रात संताप
  • महिलांवरील अत्याचाराविरोधात विविध संघटना आक्रमक

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

समृद्धी महामार्गावर आयशरची कंटेनरला धडक; अपघातात चालकाचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर आयशरची कंटेनरला जोरदार धडक; ३३ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू

खामगावात चारित्र्याच्या संशयातून पत्नीला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

चारित्र्याच्या संशयाने संसार उद्ध्वस्त; ‘तुझे कोणासोबत लफडे आहे’ म्हणत पत्नीला बेदम मारहाण, अखेर मृत्यू

बकरीच्या पैशांवरून वादानंतर वडिलांचा मृत्यू

म्हातारपणी ज्या मुलाकडून आधाराची अपेक्षा होती, त्याच मुलाने बकरीच्या पैशांवरून घेतला वडिलांचा जीव

अंढेरा पोलिसांनी पकडलेले अवैध रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर

अंढेरा पोलिसांची मोठी कारवाई! रेतीची अवैध वाहतूक करणारे २ टिप्पर पकडले; ८ ब्रास रेतीसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

चिखली-खामगाव मार्गावर बस आणि टिप्परची जोरदार धडक

चिखली-खामगाव मार्गावर भीषण अपघात! बस-टिप्परची जोरदार धडक; टिप्परचा चुराडा

चिखलीतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडे निवेदन देताना उपनगराध्यक्ष वैशालीताई खेडेकर

चिखलीत मुलींच्या छेडछाडीविरोधात उपनगराध्यक्षांचा पोलिसांना इशारा; “कारवाई करा, अन्यथा महिलांना घेऊन रस्त्यावर उतरू!”

Leave a Comment